'सत्तेचा वापर अन् आमिष दाखवून मिळवलेला विजय'; जळगावात भाजपाची सत्ता गेल्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 09:01 AM2021-03-19T09:01:05+5:302021-03-19T09:01:27+5:30

भाजपाचे २७ नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या ३ नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेला बहुमतापेक्षाही जास्त मते मिळाली.

'Victory achieved through the use of power and lure'; praveen darekar reaction after the BJP came to power in Jalgaon | 'सत्तेचा वापर अन् आमिष दाखवून मिळवलेला विजय'; जळगावात भाजपाची सत्ता गेल्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया

'सत्तेचा वापर अन् आमिष दाखवून मिळवलेला विजय'; जळगावात भाजपाची सत्ता गेल्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया

Next

जळगाव: भारतीय जनता पक्षाचे तब्बल २७ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने जळगाव महापालिकेत सांगली पॅटर्नच्या धर्तीवर सत्तांतर घडवून आणले. महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव केला, तर उपमहापौरपदी भाजपाचे बंडखोर कुलभूषण पाटील विजयी झाले. भाजपाचे उमेदवार सुरेश सोनवणे यांचा त्यांनी १५ मतांनी पराभव केला.

या निवडणुकीत भाजपाचे २७ नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या ३ नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेला बहुमतापेक्षाही जास्त मते मिळाली. काही दिवसांपूर्वी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसने ‘ऑपरेशन लोटस्‌’ यशस्वी करत भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली. त्याचीच पुनर्रावृत्ती जळगावात झाली. भाजपाला हा पराभव चांगलाच जिव्हारी चांगली. भाजपाच्या या पराभवानंतर ''सत्तेचा वापर अन् आमिष दाखवून मिळवलेला हा विजय'' असल्याचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. 

२०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने ७५ पैकी ५७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले होते. मात्र, अडीच वर्षांतच भाजपाला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली आहे. आ. सुरेश भोळे यांच्याविरुद्ध असलेली नाराजी, भाजपाकडून देण्यात आलेल्या उपमहापौर पदाच्या उमेदवाराला असलेला विरोध यामुळे भाजपाचे तब्बल २७ नगरसेवक शिवसेनेला जाऊन मिळाले. त्यानुसार गुरुवारी झालेल्या ऑनलाइन निवडणुकीत शिवसेनेने यश मिळवले.

भाजपा सुप्रीम कोर्टात जाणार - 

महापौर, उपमहापौर निवडप्रसंगी शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या अर्जाला भाजपकडून हरकत घेण्यात आली. पीठासन अधिकाऱ्यांनी भाजपची हरकत फेटाळून लावत अर्ज वैध ठरवला. पीठासन अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध   सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा भाजपने दिला.
 

Web Title: 'Victory achieved through the use of power and lure'; praveen darekar reaction after the BJP came to power in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.