VIDEO : आता बसचालक बनणार कंडक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2016 04:48 PM2016-10-22T16:48:27+5:302016-10-22T16:52:03+5:30
राज्यभरात सुरु असलेल्या नॉनस्टॉप बससेवेसाठी प्रवाशांचे तिकिट काढण्याची जबाबदारी चालकावर सोपवून आर्थिक बचतीचा निर्णय राज्य परिवहन मंडळाने घेतला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. २२ - राज्यभरात सुरु असलेल्या नॉनस्टॉप बससेवेसाठी प्रवाशांचे तिकिट काढण्याची जबाबदारी चालकावर सोपवून आर्थिक बचतीचा निर्णय राज्य परिवहन मंडळाने घेतला आहे.
धुळे-जळगाव बससेवेदरम्यान काही चालकांना वाहकांकडून प्रवाशांचे तिकिट फाडण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. धुळे आगाराने हा उपक्रम नुकतच हाती घेतला आहे. धुळे-नाशिक आणि धुळे-जळगाव अशा दोन नॉनस्टॉप बससेवा विनावाहक राबविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.