टोळक्याकडून व्हीडीओ पार्लरची तोडफोड

By admin | Published: March 31, 2017 12:35 AM2017-03-31T00:35:24+5:302017-03-31T00:35:24+5:30

निवृत्त फौजदाराला मारहाण : फुले मार्केट परिसरातीलही कापड दुकानाची काच फोडली

VIDEO parlor deal from gang | टोळक्याकडून व्हीडीओ पार्लरची तोडफोड

टोळक्याकडून व्हीडीओ पार्लरची तोडफोड

Next

जळगाव : ख्वॉजामिया चौकाला लागून असलेल्या प्रताप नगरातील न्यू इलू व्हिडीओ पार्लर या दुकानात गुरुवारी संध्याकाळी साडे सात वाजता दहा ते 15 जणांच्या टोळक्याने प्रवेश करुन हातातील काठी व सळईने काच, टिव्ही व अन्य साहित्याची नासधूस करुन सेवा निवृत्त सहायक फौजदारासह दोघांना मारहाण केली तर या घटनेनंतर तासाभराने फुले मार्केट परिसरातही चार ते पाच जणांनी जय बाबा या कापड दुकानाची काच फोडली.
प्रताप नगरात रस्त्याला लागून संजय जगन्नाथ पाटील यांच्या मालकीचे न्यू इलू व्हिडीओ पार्लर नावाचे दुकान आहे. पाटील यांनी दुकानासमोरच ज्ञानेश्वर काशिनाथ सूर्यवंशी यांना कपडे इस्त्री करण्यासाठी जागा दिली आहे. त्या ठिकाणी सूर्यवंशी टेबल लावतात. सोमवारी एक रिक्षा चालक या टेबलवर बसला असता संजय पाटील यांचे वडील निवृत्त सहायक फौजदार जगन्नाथ श्रीपत पाटील यांनी त्याला हटकले होते. या गोष्टीचा राग आल्याने रिक्षा चालक दहा ते 15 जण घेऊन गुरुवारी संध्याकाळी साडे सात वाजता दुकानात आला व काहीही न बोलता या सर्वानी दुकानाची तोडफोड करायला सुरुवात केली. त्यांना रोखण्याचा प्रय} करायला गेलेल्या संजय पाटील व त्यांचे वडील जगन्नाथ पाटील यांनाही या टोळक्याने मारहाण केली. या हल्लयात एक टिव्ही, दुकानाचे बॅनर, खुच्र्या व किरकोळ साहित्याचे नुकसान झाले आहे.दरम्यान, जिल्हा पेठचे उपनिरीक्षक गिरधर निकम, रवी नरवाडे, अल्ताफ पठाण यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर संशयिताचा शोध घेतला, त्यातील एका जणाचे नाव निष्पन्न झाले होते, मात्र उशिरार्पयत त्याला ताब्यात घेतले नव्हते. फुले मार्केट परिसरातील जय बाबा या कापड दुकानाचाही चार ते पाच जणांनी काच फोडला व त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. दुकान मालकाने पोलीस स्टेशन गाठून माहिती दिली.हल्लेखोर समजू शकले नाहीत.


‘हम गुंडे है..’
 टोळीतील मुख्य सूत्रधार असलेला रिक्षा चालक संजय पाटील व त्यांच्या वडीलांना धमकावत होता. ‘हम गुंडे है, हमारा कोईभी बिघाड नही सकता’ असे म्हणून धमकावत होता.त्याच्या रिक्षाचा क्रमांक एम.एच.19 व्ही.6835 असा असून तो हरीविठ्ठल नगरातील रहिवाशी असल्याचे पाटील यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, एकाच्या दुचाकीवर ‘हम गुंडे है’ असे मागे लिहिलेले आहे तर नंबरप्लेटच्या जागीही नंबर न लिहिता वेगळेच नाव लिहिले आहे.


भादली हत्याकांडाचा चाळीसगाव दरोडय़ाच्या दिशेनेही तपास
भादली हत्याकांडातील मारेक:यांर्पयत पोलिसांना अद्यापर्पयतही पोहचता आलेले नाही. दरम्यान, 3 मार्च रोजी चाळीसगाव येथे झालेल्या दरोडा व भादली हत्याकांड या दोन्ही घटनांमध्ये काही अंशी साम्य असल्याने पोलिसांनी त्यादृष्टीनेही तपास सुरु केला आहे. दरम्यान, आतार्पयत शंभराच्यावर जणांची चौकशी झाली असून 42 जणांचे लेखी जबाब नोंदविण्यात आले आहेत.


हातगाडीला आग
खाद्य पदार्थाच्या गाडीवरील सिलिंडरची नळी निघून भडका झाल्याने लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक झाले. यात तीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी न्यू.बी.जे. मार्केट परिसरात घडली. अमजद खान खलील खान (रा.गेंदालाल मील परिसर) यांनी  नाश्ताच्या हातगाडय़ा सुरु केल्या आहेत. गुरुवारी दुपारी कारागीर गाडीवर काम करीत असताना अचानक सिलिंडरची नळी निघून भडका झाला.

 

Web Title: VIDEO parlor deal from gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.