अमळनेर आमदारांच्या मोबाईलवरुन राष्ट्रगीत प्रसंगीचे व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 10:44 PM2019-05-02T22:44:15+5:302019-05-02T22:45:16+5:30

गुन्हा दाखल करा: माजी आमदार साहेबराव पाटील यांची तक्रार

Video viral of national anthem of Amalner MLA's mobile phone | अमळनेर आमदारांच्या मोबाईलवरुन राष्ट्रगीत प्रसंगीचे व्हिडीओ व्हायरल

अमळनेर आमदारांच्या मोबाईलवरुन राष्ट्रगीत प्रसंगीचे व्हिडीओ व्हायरल

Next


अमळनेर : येथील महाराष्ट्र दिनी राष्ट्रगीत सुरु असताना ध्वजारोहणाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. हा कायद्याचा भंग असून संबंधिता विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केली. आहे. दरम्यान हे व्हिडिओ आमदार शिरीष चौधरी यांच्या मोबाईलवर क्रमांकावरुन व्हायरल झाले असून
महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी तहसील आवारात ध्वजारोहण प्रसंगी राष्ट्रगीत सुरू असताना ध्वजारोहणचे फोटो व व्हिडीओ काढून सोशल मीडिया द्वारे ते व्हायरल करणाऱ्यां विरुद्ध राष्ट्रीय सन्मानाचा अप्रतिष्ठेस प्रतिबंध अधिनियम १९७१ कलम ८९ अन्वये कारवाई करण्याची मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत माहिती अशी की, १ मे रोजी येथील तहसील आवारात आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मात्र ध्वजारोहण प्रसंगी राष्ट्रगीत सुरू असताना काढण्यात आलेले फोटो आणि व्हिडीओ ८३७९९२२८८८ या क्रमांकाच्या मोबाईलवरून सोशल मिडियातुन व्हायरल करण्यात आले आहेत. याबाबत माजी आमदार साहेबराव पाटील यांनी प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर घटना राष्ट्रीय सन्मानाच्या प्रतिष्ठेस प्रतिबंध अधिनियम १९९१, अधिनियम क्रमांक ६९अन्वये चुकीची असून कायद्यात असे करणे अभिप्रेत नाही. या अधिनियम अन्वये राष्ट्रगीत सुरू असताना स्तब्ध उभे राहणे आवश्यक आहे. मात्र सदर कायद्याचे उल्लंघन करत या कार्यक्रमाचे चित्रीकरण करून व फोटो काढून ते वरील नंबरच्या मोबाईल धारकाने ते सोशल मीडियातून व्हायरल केलं आहेत. त्यामुळे त्या मोबाईल धारकविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

‘तो’ मोबाईल क्रमांक माझाच आहे. मात्र संबंधित व्हिडिओ राष्ट्रगीत सुरु होण्याच्या आधीचा असून त्यावेळी सक्षम अधिकारी देखील उपस्थित होते.
- आमदार शिरीष चौधरी

Web Title: Video viral of national anthem of Amalner MLA's mobile phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.