विाघूर धरण पुनर्वसित गावांचा वीजपुरवठा खंडित
By admin | Published: March 24, 2017 12:40 AM2017-03-24T00:40:18+5:302017-03-24T00:40:18+5:30
थकबाकीमुळे कारवाई : शिंगाईत, डोहरी, खादगावचा पाणीपुरवठा बंद
जामनेर : वाघूर धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या गावांपैकी शिंगाईत, डोहरी व खादगाव या गावांचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने तोडल्याने या तीनही गावांचा पाणीपुरवठा गेल्या पाच दिवसांपासून बंद झाला आहे. वाघूर धरण विभागाने वीज बिलाची थकीत रक्कम न भरल्याने ही कारवाई केल्याचे वीज वितरण कंपनीचे म्हणणे आहे.
पुनर्वसन झालेल्या गावांना वीज, पाणीपुरवठय़ासह इतर सुविधा पुरविण्यार्पयत जबाबदारी वाघूर धरण विभागाची आहे.
शिंगाईत, डोहरी व खादगावचा पाणीपुरवठा वाघूर धरणावरून होतो. या पाणीपुरवठय़ासाठी लागणा:या विजेचे बिल आजपावेतो वाघूर धरण विभागाकडून अदा केले जात आहे. वीज बिलाची थकीत रक्कम अशी- शिंगाईत- 1 लाख 21 हजार, डोहरी- 1 लाख 12 हजार व खादगाव 90 हजार. थकीत वीज बिल भरले न गेल्याने वीज वितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता पुरवठा खंडित केल्याने तीनही गावांचे नागरिक त्रस्त झाले आहेत.
आमचे गाव वाघूर धरण पुनर्वसित नवीन गावठाणमध्ये स्थलांतरित झाले असून आजर्पयत विजेचे बिल वाघूर धरण विभागानेच भरले आहे. मागील दंडाची रक्कम 82 हजार व चालू बिल 34 हजार इतकी रक्कम विभागाने न भरल्याने वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी गावाला पाच दिवसांपासून पाणीपुरवठा केला जात नाही. वाघूर धरण विभागाशी वेळोवेळी संपर्क साधून देखील त्यांनी दखल घेतली नाही. -वत्सला सुरेश भोई, सरपंच, शिंगाईत
वाघूर धरण विभागाने या तीनही गावांकडे असलेली विजेची थकबाकीची रक्कम आमचेकडे जमा न केल्याने व वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार आम्ही वीजपुरवठा खंडित केला आहे. वाघूर धरण विभागाने थकबाकी जमा केल्यावर वीजपुरवठा पूर्ववत सुरू करू.
-एस.के.पाटील, उपकार्यकारी अभियंता, जामनेर विभाग
शंगाईत, डोहरी व खादगाव या गावांच्या थकीत वीज बिलाची रक्कम धनादेशाद्वारे अदा करण्यात येत आहे. त्यांना रक्कम मिळताच वीजपुरवठा सुरू होईल. -सी.के.पाटील, सहायक अभियंता, वाघूर धरण विभाग