लोकशाही बळकट करण्यासाठी पालकांकडून भरले जातात संकल्प पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 02:04 PM2019-04-06T14:04:49+5:302019-04-06T14:05:34+5:30
जनजागृती कार्यक्रम
अमळनेर : लोकशाही बळकट करण्यासाठी आणि नागरिकांनी नि:पक्षपातीपणे मतदान करण्यासाठी निवडणूक आयोग शाळांच्या मार्फत पालकांकडून सक्तीने संकल्पपत्र भरून घेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही मतदान व निवडणूक विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे
मतदान जागृती करण्यासाठी, आणि जाती धर्मावर , पैशांवर निवडणूक होऊ नये म्हणून प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांचे संकल्प पत्र भरून घेण्याची जबाबदारी शिक्षकांना देण्यात आली आहे.
निवडणूक काळात गावतील विविध चर्चांमुळे व घडामोडींमुळे लहान मुले निवडणुकीबाबत गैरअर्थ काढत होते. मात्र पालकांपर्यंत संकल्प पत्र पाठवण्यासाठी विद्यार्थ्यांजवळ द्यावे लागत आहे. त्यामुळे साहजिकच लहान मुलांवर निवडणूक व मतदान प्रामाणिकपणे झाले पाहिजेत असे संस्कार होत आहेत, अशी प्रतिक्रया मंगळूर माध्यमिक शाळेचे शिक्षक प्रभुदास पाटील यांनी व्यक्त केली आहे.