विहीर घोटाळा धुळे प्रकल्पातही!

By admin | Published: July 6, 2016 12:57 AM2016-07-06T00:57:16+5:302016-07-06T00:57:16+5:30

गैरव्यवहाराची रक्कम वाढण्याची शक्यता

Vihir Scam Dhule also in the project! | विहीर घोटाळा धुळे प्रकल्पातही!

विहीर घोटाळा धुळे प्रकल्पातही!

Next
>तळोदा, नंदुरबारनंतर धुळे आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पातही विहीर घोटाळ्याचा संशय बळावला असताना या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता दाट शक्यता आहे. या योजनेत एक कोटी 78 लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी तळोद्यात गुन्हा दाखल आहे. नंदुरबार प्रकल्पातही 52 लाख 50 हजार रुपयांची कामे कागदावरच झाल्याचे उघड झाले. हाच कित्ता धुळे प्रकल्पातही गिरवला गेला आहे. नंदुरबार प्रकल्पाच्या विभाजनानंतर धुळे प्रकल्प अस्तित्वात आला. त्याचवेळी ही योजना हाती घेतली. नंदुरबारसाठी मंजूर निधीतून सव्वा कोटी रुपयांचा निधी याच योजनेसाठी वर्ग करण्यात आला. तळोद्यातील गैरव्यवहाराची प्रक्रिया त्याचपद्धतीने धुळ्यात राबवली गेल्याचा संशय आहे.
 
 
विहीर योजनाप्रकरणी धुळे प्रकल्पातील स्थितीबाबत माहिती नाही. जर नंदुरबार प्रकल्पातून निधी वर्ग झाला असेल तर त्याची चौकशी व तपासणी करू.
-अण्णा थोरात, प्रकल्पाधिकारी, धुळे

Web Title: Vihir Scam Dhule also in the project!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.