चाळीसगावच्या गावकीत आता सरपंचपदासाठी लाॕबिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 09:20 PM2021-01-30T21:20:28+5:302021-01-30T21:22:37+5:30
सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत निघताच मिनी मंत्रालय असणा-या गावकीत राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहे.
Next
ref='https://www.lokmat.com/topics/chalisgaon/'>चाळीसगाव : सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत निघताच मिनी मंत्रालय असणा-या गावकीत राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहे. सरपंचपदाची खुर्ची मिळविण्यासाठी सदस्यांना सहलींचे पॕकेज मिळाले आहे. आरक्षणानंतर कुठे गणित बिघडले. तर काहींचे गणित आपसूक सुटले आहे. आता प्रतीक्षा आहे ती सरपंच निवडीची तारीख जाहिर होण्याची.७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर तब्बल दहा दिवसानंतर सरपंचपदाचे आरक्षण निघाले. यामुळे गावकीत पुन्हा फटाके फुटले. काहींचे फटाके मात्र तसेच पडून आहे. काहींनी गुलाल उधळला. तर भलतेच आरक्षण निघाल्याने काहींचा गुलाल तसाच पडून आहे. निवडणुका ७६ ग्रामपंचायतींच्या झाल्या असल्या तरी तालुक्यातील सर्व ११० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत निघाली आहे. यावेळी १० ग्रामपंचायतींनी बिनविरोधचे तोरण बांधले. निघालेले आरक्षण २०२५ पर्यंत असणार आहे.५५ गावांमध्ये 'ती' सरपंच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण असल्याने ५५ गावांमध्ये गावगाड्याचा रथ महिला सरपंचांच्या हाती असणार आहे. नुकत्याच निवडणूक झालेल्या ७६ ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जमाती प्रर्वगातील सात महिला सरपंच असतील. अनुसूचित जाती प्रर्वगातील महिलांना तीन गावांमध्ये संधी मिळणार आहे. १२ मिनी मंत्रालये नागरिकांच्या मागास प्रर्वगातील महिलांकडे असतील. सर्वसाधारण प्रर्वगातील २१ महिला सरपंच होतील. ७६ ग्रामपंचायतींचा ताळेबंद पाहता ४३ गावांमाध्ये महिलाराज असेल. ३३ ठिकाणी सूत्रे पुरुष सरपंचांच्या हाती असतील.सहा गावांमध्ये सरपंचपदाचे त्रांगडे, जिल्हाधिका-यांकडून मार्गदर्शन घेणारपिंप्री खुर्द, पिलखोड, खरजई येथील सरपंचपदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती महिला प्रर्वगासाठी निघाले आहे. मात्र येथे याच प्रर्वगातील महिला सदस्या निवडून आलेल्या नाहीत. अनुसूचित जमाती प्रर्वगातही असाच तिढा आहे. वाघडू, घोडेगाव, खडकी बुद्रूक येथील सरपंचपदे अनुसूचित जमाती प्रर्वगातील महिलांसाठी राखीव आहेत. मात्र येथेही याच प्रर्वगातील महिला सदस्या नाही. याबाबत जिल्हाधिका-यांकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. अशी माहिती निवडणुक शाखेने दिली. मोठ्या गावांमध्ये जुळवून घ्यावी लागतील गणिते.शहरालगत व तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठी असणा-या टाकळी प्र.चा.चे मिनी मंत्रालय सर्वसाधारण प्रर्वगातील महिलेच्या हाती असणार आहे. यागावकीत निवडणुकीच्या काळात मोठी चुरस होती. विद्यमान सत्ताधा-यांनी नऊ जागा मिळवत सत्ता कायम ठेवली. सर्वसाधारण प्रर्वगातील पाच महिलांची नावे सरपंचपदाच्या शर्यतीत आहे. यामुळे एका नावावर एकमत करतांना पॕनल प्रमुखांची कसोटी लागणार आहे.पिलखोडमध्ये भाजपची सत्ता उलथवून लावताना राष्ट्रवादीने सर्व जागा जिंकल्या. मात्र सरपंचपदी अनु. जाती प्रर्वगातील महिलेची वर्णी लागणार आहे. मात्र याप्रर्वगातील महिला सदस्या येथे नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय देतात. यावर येथील तिढा सुटेल. गेल्या अनेक वर्षात प्रथमच सरपंचपद भूषविण्याची संधी अनु. जाती प्रर्वगाला मिळाली आहे.सायगावात राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य भूषण पाटील यांनी जोर लावत सत्ता कायम राखली. तथापि येथे यावेळी महिलाराज असणार आहे. पाटील यांचे बहुमत असतानादेखील त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना प्रणित धर्मा काळे यांच्या पॕनलमधील अनु. जमाती प्रर्वगातील कमळाबाई वामन भिल यासरपंचपदी विराजमान होणार आहे. भूषण पाटील यांना उपसरपंचपदावर समाधान मानावे लागणार आहे.बहाळच्या मिनी मंत्रालयाच्या चाव्यादेखील महिलेच्याच हाती असतील. येथे राष्ट्रवादीला चेकमेट देत भाजपाच्या दिनेश बोरसे व स्मितल बोरसे यांनी सत्ता खेचून आणली. नागरिकांच्या मागास प्रर्वगातील पुरुष सदस्य सरपंच होईल. बोरसे यांनी नऊ जागा जिंकून बहुमत राखले आहे. त्यांच्या पॕनल मधील चार जण याशर्यतीत असून दिनेश बोरसे हेच अंतिम निर्णय घेतील.राजकीयदृष्ट्या हाॕटस्पाॕट ठरलेल्या वाघळीचा समना यावेळी राष्ट्रवादीने जिंकत गतवेळच्या पराभवाचा शिक्का पुसला. येथेही सरपंचपदी महिला विराजमान होईल. सर्वसाधारण महिला प्रर्वगाचे आरक्षण निघाले आहे. पॕनल प्रमुख अभय सोनवणे हेच अंतीम नावावर शिक्कामोर्तब करतील.