ओझर शिवारात गावठी दारूची भट्टी उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 10:01 PM2021-04-25T22:01:37+5:302021-04-25T22:02:08+5:30

चाळीसगाव शहर पोलिसांनी  २५ रोजी सकाळी छापा मारून गावठी दारूचे कच्चे, पक्के रसायन व तयार दारू असा एकूण ८४ हजार १५० रुपये किमतीचा  मुद्देमाल जप्त केला.

Village liquor distillery destroyed in Ojhar Shivara | ओझर शिवारात गावठी दारूची भट्टी उध्वस्त

ओझर शिवारात गावठी दारूची भट्टी उध्वस्त

Next
ठळक मुद्दे८४ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : तालुक्यातील ओझर शिवारातील गावठी दारू तयार करण्याच्या भट्टीवर चाळीसगाव शहर पोलिसांनी  २५ रोजी सकाळी छापा मारून गावठी दारूचे कच्चे, पक्के रसायन व तयार दारू असा एकूण ८४ हजार १५० रुपये किमतीचा  मुद्देमाल जप्त करुन त्याचा जागेवर नाश करण्यात आला. चार जणांवर चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओझर शिवारात शेतात गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावर  २५ रोजी पोलीस निरीक्षक  विजयकुमार ठाकूरवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक  सचिन कापडणे, उपनिरीक्षक महावीर जाधव, हवालदार गणेश पाटील, अभिमान पाटील, पंढरीनाथ पवार, प्रवीण संगेले, विनोद भोई, विनोद खैरनार, भूषण पाटील, प्रकाश पाटील, सतीश राजपूत, भगवान माळी यांनी  छापा मारून ठिकाणावरुन २०० लीटर उकळते रसायन, २६२५ लीटर कच्चे रसायन, ७७० लीटर गावठी दारू असा एकूण ८४,१५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागेवर नाश करण्यात आला.

याप्रकरणी शोभाबाई रोहिदास बोरसे,  गोपाल रमेश सोनवणे,  कमलबाई भुरा दळवी, धनराज भिका गायकवाड सर्व रा. ओझर, ता. चाळीसगाव यांच्याविरुध्द दारुबंदी सदराखाली वेगवेगळे चार गुन्हे दाखल करण्यात आले.

Web Title: Village liquor distillery destroyed in Ojhar Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.