नकली हि-यांचे गाव, त्याचे नाव घोडसगाव
By admin | Published: April 6, 2017 05:21 PM2017-04-06T17:21:01+5:302017-04-06T17:21:01+5:30
मुक्ताईनगर तालुक्यात निमखेडी ते घोडसगाव दरम्यानच्या पट्टय़ात जमिनीखाली पांढ-या स्फटीकांचा साठा आढळून आला आहे. जमिनीखाली 5 ते 50 फुटावर लागणारा हा स्फटीक पट्टा सुमारे साडे चार फूट उंचीचा थर आहे.
Next
संशोधकांसाठी आवाहन : घोडसगाव परीसरात पाच फूट उंचीचा थर
मुक्ताईनगर,दि.6- तालुक्यात निमखेडी ते घोडसगाव दरम्यानच्या पट्टय़ात जमिनीखाली पांढ-या स्फटीकांचा साठा आढळून आला आहे. जमिनीखाली 5 ते 50 फुटावर लागणारा हा स्फटीक पट्टा सुमारे साडे चार फूट उंचीचा थर आहे. घोडसगाव परिसरात उत्खनन करून काही मजूर यातून रोजगार मिळवत आहे. नकली हिरे म्हणून स्फटीकाला अवघे घोडसगाव ओळखते.
केंद्र शासनाच्या ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन (ओएनजीसी) तर्फे ग्रिन प्रोजेक्ट अंतर्गत भूगर्भातील तेल, वायू व खनिज साठा शोधण्यास भूगर्भात छिद्र पाडून शोध घेतला जात आहे. अशातच निमखेडी खु.।। ते घोडसगाव दरम्यान जमिनीतील स्फटीक साठय़ाचा प्रकार पुन्हा उजेडात आला आहे.
1990 ते 1991 दरम्यान पुर्नवसीत घोडसगावात पुनर्वसन खात्याअंतर्गत रस्ते पाडण्याचे काम सुरू असताना रस्त्यांवर मुरूम टाकण्यास गावठाण परिसरात करण्यात आलेल्या उत्खननात पहिल्यांदा पांढ:या स्फटीकांचे दर्शन घोडसगाववासीयांना झाले. उत्खननातून मोठय़ा प्रमाणात स्फटीक जमा करून काही लोकांनी अजिंठा, वेरूळ, मुंबई येथे त्याची विक्री केली आहे. दुय्यम दज्र्याच्या या खनिजातून अनेकांना रोजगार मिळाला वरच्यावर जेवढे खनिज खोदून हातात आले नंतर जमिनी खालून हे स्फटीक काढणे मोठय़ा जिकरीचे झाल्याने आज रोजी फक्त 6 ते 7 मजूर फावल्या वेळेत खोदकाम करून मजुरी हातात पडेल इतके स्फटीक काढून विकत आहेत.
अजिंठा, वेरुळ, मुंबई येथील काही नामवंत दुकानात या पांढ:या स्फटीकांची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. परदेशी पर्यटकांना या स्फटीकरुपी दगडांचे मोठे आकर्षण तर आहेत तसेच देशाअंतर्गत घरातील सजावट व बगीच्यातील वॉटर फाऊंन्टन सजावटीसाठी याला मोठी मागणी आहे. आकर्षक अशा पांढ:या व जांभळय़ा रंगाच्या या स्फटीकांना घेण्यासाठी अजिंठा, वेरुळ व मुंबई येथील व्यापारी अनेकदा येथे येतात.
तालुक्यात जवळपास 10 ते 14 कि. मी.अंतराच्या या विशिष्ट पट्टय़ातील भुगर्भात दडलेल्या या खनिजावर संशोधन होऊन यातून रोजगार संधी निर्माण करता येणे शक्य आहे. या दृष्टीकोनातून शासन स्तरावर याची दखल घेतली जावी अशी अपेक्षा नागरिकांना आहे. (वार्ताहर)
रस्त्यावर मुरूम टाकण्यास काढण्यात आलेल्या गौण खनिजातून हे स्फटीक साठा समोर आला. गावातील काही मजूर उत्खनन करून स्फटीक काढतात. पर्यटन स्थळावरील दुकानदारांमध्ये स्फटीकचे घोडसगाव अशी ओळख या निमित्ताने झाली आहे तर गावात नकली हिरे म्हणून स्फटीकाला संबोधले जाते.
- विलास धायडे,
माजी सभापती,रा.घोडसगाव
मुंबई येथील व्यापा:याकडे स्फटीक घेऊन जाताना छत्रपती शिवाजी टर्मिनलवर मला पोलिसांनी पकडले माङयाजवळ दोन झोल्यांमध्ये हे कागदात गुंढाळलेले स्फटिक होते झोले उघडताच पोलीस ओरडले हिरे ! कोठून आणले ? त्यांनी चौकशी केली झोल्यामध्ये घरून भाकर बांधून नेली होती ते पाहून त्यांना मी मजूर असल्याचा विश्वास बसला तेव्हा माझी सुटका झाली 20 वर्षा पासून हे काम करतोय पण रोजंदारी शिवाय काहीच मिळाले नाही आज ही कुळाच्या घरात राहतो वय झाल्याने आता खोदकाम होत नाही.
- रमेश दुट्टे,
खोदकाम मजूर,घोडसगाव