अतिरिक्त कामे न करण्यावर ग्रामसेवक संघटना ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:30 PM2019-08-14T12:30:35+5:302019-08-14T12:31:34+5:30

जि़ प़ समोर धरणे: वेतनश्रेणीबाबत ठोस आश्वासनाशिवाय माघार न घेण्याचा पवित्रा

 The Village Seva Association is responsible for not doing extra work | अतिरिक्त कामे न करण्यावर ग्रामसेवक संघटना ठाम

अतिरिक्त कामे न करण्यावर ग्रामसेवक संघटना ठाम

Next

जळगाव : आधीच १५५ योजना राबविण्याची जबाबदारी असताना अनेक अतिरिक्त कामे सोपविली जातात, यामुळे मानसिक तणावात असल्याने आता अतिरिक्त कामे न करण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचे सांगत जोपर्यंत वेतनश्रेणीबाबत ठोस आश्वासने मिळत नाही, तोपर्यंत असहकार आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा राज्य ग्रामसेवक युनियन डी़ एऩ ईने घेतला आहे़
संघटनेतर्फे सहाशे ते सातशे ग्रामसेवकांनी जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडली़ ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वेतनत्रृटी दूर व्हावी, राज्यभर सजे व पदे वाढ करणे, प्रवास भत्ता मंजूर करणे, पदवीधर ग्रामसेवक नेमणुका होणे या मागण्यांसाठी सकाळी दहा वाजेपासून हे आंदोलन करण्यात आले़ संघटनेला शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन पुकारण्यात आले आहे़ जनतेला वेठीस धरायचे नसल्याने कामबंद आंदोलन केले नाही, मात्र, शासनाने दखल न घेतल्यास काम बंद आंदोलन केले जाईल, तसेच फळबाग लागवड योजनेवर बहिष्कार टाकण्यात आल्याचे राज्य कोषाध्यक्ष संजय निकम यांनी सांगितले़ १६ आॅगस्ट रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन होणार असून जिल्हाभरातून मोठी उपस्थिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले़ यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोराडे, सरचिटणीस संजय भारंबे, उपाध्यक्ष अशोक खैरनार, कार्याध्यक्ष सी़ एम़ सोनवणे, महिला संघटक रूपाली साळुंखे, कल्याणी पाटील, मानद अध्यक्ष जी़ एम़ पवार, मानद सचिव गौतम वाडे व ग्रामसेवक उपस्थित होते़
रक्षा खडसे यांचा पाठिंबा
ग्रामसेवकांच्या धरणे आंदोलनास खासदार रक्षा खडसे यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले़ आंदोलनाला जि़ प़ उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, महिला व बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, आरोग्य सभापती दिलीप पाटील आदींनी भेटी दिल्या़

Web Title:  The Village Seva Association is responsible for not doing extra work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.