आमदारांच्या दत्तक गावात पाण्याअभावी ग्रामस्थ जेरीस
By admin | Published: April 11, 2017 12:50 AM2017-04-11T00:50:14+5:302017-04-11T00:50:14+5:30
उमाळेकरांना विकास कामांची प्रतीक्षामनपाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पावरून पाण्यासाठी ग्रा.पं.च्या पत्राला केराची टोपली
चंद्रकांत जाधव जळगाव
शहरापासून फक्त 12 किलो मीटर अंतरावर असलेल्या उमाळे गावाला आमदार सुरेश भोळे यांनी शासनाच्या आदर्श ग्राम योजनेतून दत्तक घेतले आहे. पण हायमास्टपलीकडे आमदार निधीतून अजून कुठलीही कामे झालेली नाहीत. गावाची लोकसंख्या सहा हजारांवर आहे. चार प्रभाग असून, ग्रामस्थांना पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेअभावी हाल सहन करावे लागत आहेत. ग्राम पंचायतीने पत्रव्यवहार करून महा पालिकेच्या उमाळे शिवारातील जल शुद्धीकरण प्रकल्पावरून पाणी मिळण्यासाठी पत्रव्यवहार केला, पण या गावाला औद्योगिक दराने पाणी देऊ, अन्यथा नाही, अशी पालिकेने आडकाठी घातली आहे. लालफितशाही, सत्तेच्या राजकारणातून ग्रामस्थांचा त्रास न वाढविता मार्ग काढावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
आदर्श ग्राम योजनेतून अजून कामांना सुरुवात नाही
आमदार सुरेश भोळे यांनी उमाळे गाव आदर्श ग्राम योजनेतून दत्तक घेतले आहे. अजून या योजनेतून एकही काम झालेले नाही. कामांचा कृती आराखडा सादर केला आहे. 10 लाख रुपये ग्रा.पं.च्या स्वतंत्र खात्यात जमा झाले आहे. त्यातून लवकरच कामे सुरू करू. या योजनेसंबंधीच्या कामांना तांत्रिक मुद्दय़ांमुळे उशीर झाला, पंचायत किंवा कुण्या पदाधिका:याची यात चूक नसल्याचेही स्पष्टीकरण ग्रा.पं.ने दिले.
मनपाची औद्योगिक दरात पाणीपुरवठय़ाची अट
महापालिकेच्या वाघूर प्रकल्पावरून आलेल्या जलवाहिनीचे शुद्धीकरण केंद्र उमाळे शिवारात आहे. या केंद्राद्वारे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ग्रा.पं.ने पालिकेस पत्र दिले, पण गावास औद्योगिक दराने पाणी देऊ. त्याचे दर एक हजार लीटरमागे 21 रुपये, असे असतील.. असा खुलासा पालिकेने केला आहे. त्यावर हे केंद्र उमाळे शिवारात असताना त्याचा कुठलाही ग्रा.पं.कर पालिकने भरलेला नाही. आठ वर्षात जवळपास आठ लाख रुपये कर थकल्याने या केंद्राला सील करू, अशी भूमिका ग्रा.पं.ने घेतल्याचे काही पदाधिकारी म्हणाले.
शुद्धीकरण प्रकल्पाचे पाणी वाहून नेणा:या नाल्यावरील विहिरीद्वारे गावात पाणी
उमाळे येथे शासकीय योजना पिण्याचे पाणी देण्यास असमर्थ ठरली आहे. सध्या गावाला जलशुद्धीकरण प्रकल्पावरून प्रक्रियेनंतर बाहेर पडणा:या पाण्याच्या नाल्यानजीक खोदलेल्या विहिरीतून पाणी मिळते. हा नाला सतत वाहता असतो.. त्याच्या आजूबाजूच्या शेतांमधील विहिरांना ब:यापैकी पाणी आहे..ग्रा.पं.ला पाणीपुरवठा करणारी ही विहिर खाजगी आहे. पण पाणी पुरेसे यायला हवे, गावासाठी स्वमालकीची स्वतंत्र यंत्रणा हवी, असे ग्रामस्थांनी सांगितले.
महादेव मंदिरात सभागृह, कुंपणाची गरज
उमाळे येथील महादेवाच्या मंदिरात श्रावणात भक्तगण मोठय़ा संख्येने येतात.. त्यात तत्कालीन जि.प.सदस्य गोपाळ देवकरांच्या सहकार्याने भक्तनिवास, स्वच्छतागृह आदी कामे झाली.. तसेच लोकसहभाग, मदतीने मंदिराचे सुशोभिकरण, कूपनलिका आदी कामे घेतली.. आता सभागृह, कुंपण आदी कामे व्हायला हवीत, असे मंदिराची पाहणी केली असता जाणवले.
12 लाखांची तात्पुरती योजनाही पाण्यात
गावातील पाणीपुरवठय़ासाठी मागील काळात 12 लाखांची तात्पुरती पाणी योजना हाती घेतली. कंडारी शिवारातील विहिरीतून त्यासाठी पाणी आणायचे होते. पण विहिरीला पुरेसे पाणीच नसल्याने ही योजनाही गुंडाळली गेली.
हायमास्ट उभारतानाही राजकारण
मध्यंतरी आमदार सुरेश भोळे यांच्या सूचनेनुसार गावात तीन हायमास्ट आले, पण ते गावातील भाजपा कार्यकत्र्याच्या सूचनेनुसार उभारले जावेत, अशा सूचना होत्या. ग्रा.पं. पदाधिका:यांना विचारले नाही.. विकास करायचा असेल तर सर्वाना सोबत घ्यावे.., असे काही ग्रामस्थ म्हणाले.
प्रभाग क्र.1 मध्ये सांडपाण्याच्या व्यवस्थेचा अभाव
प्रभाग क्र.1 व देव्हारीकडे जाणा:या रस्त्याकडील भागात सांडपाण्याचे पक्के मार्ग तयार करण्याची गरज असल्याचे दिसून आले. सांडपाणी रस्त्यावरून पुढे थेट खुल्या भूखंडाकडे जात होते. तर काही गटारीही तुंबल्या होत्या.
लोकसहभागातून गावहाळ
तांडा भागात अलीकडेच गावहाळ तयार केला आहे. त्याचा पशुधनाला पिण्याच्या पाण्यासाठी लाभ होत आहे. असेच दोन गावहाळ तयार होत आहेत. त्यातील एक हाळ वनविभागाने तयार केला आहे.