मुरुम वाहतुकीवरून कुसुंब्यात ग्रामस्थांनी रोखले डंपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:24 PM2019-10-03T12:24:17+5:302019-10-03T12:24:42+5:30

महसूल पथकाच्या पाहणीत परवानगी व्यतिरिक्त आढळले दुसरेच डंपर, एक डंपर जप्त

Villagers prevented dumpers in Kusumba from acne traffic | मुरुम वाहतुकीवरून कुसुंब्यात ग्रामस्थांनी रोखले डंपर

मुरुम वाहतुकीवरून कुसुंब्यात ग्रामस्थांनी रोखले डंपर

Next

जळगाव : १०० ब्रास मुरुम उपशाची परवानगी असताना गेल्या सात दिवसांपासून बेसुमार मुरुमचा उपसा होत असल्याने संतप्त झालेल्या कुसुंबा येथील ग्रामस्थांनी बुधवारी डंपर अडवून रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल जाब विचारला. ग्रामस्थांच्या जीवाला धोका होत असल्याने या वेळी ग्रामस्थांनी चांगलाच संताप व्यक्त करीत या बाबत महसूल विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या पथकाने मुरुमने भरलेले एक डंपर जप्त केले.
कुसुंबा येथे खाजगी कामासाठी मुरुम लागणार असल्याने तहसीलदारांनी २६ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या दरम्यान कुसुंबा ग्रामपंचायतच्या गायरान जागेवरून १०० ब्रास मुरुम उचलण्याची परवानगी दिली. मात्र गेल्या सात दिवसांपासून दररोज दोन डंपरद्वारे मुरुमचा बेसुमार उपसा होत असल्याचा आरोप शेतकरी, ग्रामस्थांनी केला आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेवरून झाला संताप
या मुरुम वाहतुकीमुळे सुरेशदादा जैन नगर, कुसुंबा येथील रस्ता पूर्णपणे खराब झाला असून त्यावरून जाणे-येणे कठीण झाल्याने बुधवारी संतप्त झालेल्या कुसुंबा ग्रामस्थांनी मुरुम वाहतूक करणारे डंपर अडविले व रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली. तसेच दररोज होणाऱ्या मुरुम वाहतुकीमुळे परवानगी पेक्षा जास्त मुरुमचा उपसा झाल्याचा आरोप शेतकरी, ग्रामस्थांनी केला. गेल्या सात दिवसांपासून एक डंपर दररोज ४८ ब्रास मुरुम वाहून नेत आहे. अशा प्रकारे येथे दररोज दोन डंपरद्वारे ही वाहतूक सुरू असल्याने सात दिवसांत मोठ्या प्रमाणात मुरुम येथून नेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.
ग्रामपंचायत अंधारात
कुुसुंबा ग्रामपंचायतच्या गायरान जमिनीतूून हा मुरुम उचलण्याची परवानगी दिली असली तरी याबाबत ग्रामपंचायतला माहिती नसल्याचे सांगण्यात आले. सकाळी डंपर अडविले त्या वेळी तेथे शेतकरी, ग्रामस्थ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य नीलेश ठाकरे, भावराव महाजन, देविदास पाटील, पोलीस पाटील, राधेश्याम चौधरी हेदेखील पोहचले. त्या वेळी परवानगीबाबत ग्रामपंचायत सदस्यांनी डंपर चालकाकडे विचारणा केली.
प्रांताधिकाऱ्यांकडे केली तक्रार
सकाळी डंपर अडविल्यानंतरही संबंधित जुमानत नसल्याने शेतकरी, ग्रामस्थांनी तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली. मात्र सर्व जणांनी आपण निवडणूक कामात असल्याचे सांगितल्याने प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्याकडे या विषयी तक्रार केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानुसार प्रांताधिकाºयांनी महसूल पथकाला सूचना देऊन घटनास्थळी पाठविले. तहसीलदार वैशाली हिंगे, मंडळ अधिकारी, तलाठी यांचे पथक कुसुंब्यात पोहचले.
दुसºयाच क्रमांकाच्या डंपरद्वारे वाहतूक
मुरुम वाहतुकीची परवानगी देताना तहसीलदारांनी एम.एच. १९, ५३३१ व एम.एच. १९, ५६६८ या दोन वाहनांद्वारे मुरुम वाहतुकीची परवानगी दिली होती. मात्र ग्रामस्थांनी मुरुम वाहतूक करणारे डंपर अडविले त्या वेळी ते डंपर या दोनही डंपर व्यतिरिक्त एम.एच. १९, झेड ४९२३ या क्रमांकाचे निघाले. तसेच महसूल पथकाच्या पाहणी दरम्यानही परवानगी व्यतिरिक्त दुसºयाच क्रमांकाचे डंपर असल्याचे आढळून आले. त्यामुळे महसूल पथकाने मुरुमने भरलेले हे डंपर जप्त करीत ते जिल्हाधिकारी कार्यालयात लावले असल्याची माहिती तहसीलदार वैशाली हिंगे यांनी दिली.
मोजणी करणार
परवानगीपेक्षा जास्त मुरुम उचलल्याची ग्रामस्थांची तक्रार असली तरी किती मुरुम उचलला हे आत्ताच सांगता येणार नाही, त्यासाठी मुरुम उचलला गेला त्याठिकाणी मोजणी करण्यात येणार असल्याचे तहसीलदार हिंगे यांनी सांगितले.

कुसुंबा येथे मुरुम वाहतुकीची तक्रार आल्याने पाहणी केली असता परवानगी ज्या क्रमांकाच्या वाहनाला परवानगी दिली होती, त्या व्यतिरिक्त दुसºयाच क्रमांकाचे डंपर आढळून आले. ते जप्त केले आहे. किती मुरुमचा उपसा झाला, याची मोजणी करण्यात येईल.
- वैशाली हिंगे, तहसीलदार.

Web Title: Villagers prevented dumpers in Kusumba from acne traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव