विधवा वहिनीशी लग्न करून फुलविली संसाराची वेल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:56+5:302021-07-07T04:19:56+5:30
अमळनेर तालुक्यातील तापी काठावरील निम गावाचे सुतारकाम करणारे शेतकरी निंबा लोटन पवार (७२) यांच्या यशवंत नावाच्या लहान मुलाचे जानेवारी ...
अमळनेर तालुक्यातील तापी काठावरील निम गावाचे सुतारकाम करणारे शेतकरी निंबा लोटन पवार (७२) यांच्या यशवंत नावाच्या लहान मुलाचे जानेवारी २०१५ला अल्पशा आजाराने निधन झाले होते, तर मोठा मुलगा ताराचंद शेतकरी असून, त्याचा दोन वर्षांपूर्वीच पत्नी शीतल (धडगाव) हिच्याशी संमतीने घटस्फोट झाला आहे. लहान विधवा सून सुनीता पतीच्या निधनापासून राम-लखन या मुलांसह सासरी निम येथेच एकत्र कुटुंबात राहत होती. सुनीताचे तारुण्यातील वैधव्य व राम-लखन या लहान मुलांच्या भवितव्याचा विचार करता सुनीता व ताराचंद यांच्या विवाहासाठी सुनीताचे वडील, जवळचे नातेवाईक, समाज-बांधव कधीपासून आग्रही होते.
अखेर तापी-पांझरा पवित्र संगमावरील प्राचीन श्रीक्षेत्र कपिलेश्वर देवस्थानात परवा ताराचंद व सुनीता यांचा विवाह-सोहळा विधिवत संपन्न झाला. या वेळी मोजक्या स्वरूपात वर-वधूचे वडील अनुक्रमे निंबा पवार निम व सुरेश सुतार जळगाव तसेच मामा वासुदेव सुतार नांदेड, मेहुणे गुरुदास व गणेश (चहार्डी), फुवा प्रकाश सुतार (अडावद), आजोबा प्रकाश सुतार (कुरवेल), श्यामराव सुतार (दोंडाईचे) उपस्थित होते. दरम्यान, या निर्णयाचे निम गावात व परिसरात स्वागत होत आहे.
050721\05jal_8_05072021_12.jpg
विधवा वहिनी सुनिता व जेठ ताराचंद हे श्रीक्षेत्र कपिलेश्वर देवस्थानात विवाहबद्ध झाले.