विनोबांनी शिवाजीराव भावे यांचे केलेले मूल्यांकन दखलपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 06:18 PM2017-12-04T18:18:40+5:302017-12-04T18:19:06+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘खान्देशातील संतांची मांदियाळी’ या सदरात साहित्यिक प्राचार्य डॉ.विश्वास पाटील यांचा लेख
महाराष्ट्राच्या संत परंपरेत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेवांची एक अद्भुत त्रयी आहे. 700 वर्षाच्या कालपटानंतर महाराष्ट्र देशी असे नवल पुनरपि वर्तले. कोकणातल्या गागोदे गावी विनायक नरहर भावे, बालकृष्ण नरहर भावे आणि शिवाजी नरहर भावे या तीन बंधुंनी लौकिकाला अभिवादन करून अध्यात्म वाटेवर वाटचाल केली. मोक्ष त्यांचे लक्ष होते. ब्रrाजिज्ञासा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. अध्यात्मनिरूपण त्यांची जीवनशैली होती. महात्मा गांधी त्यांचा जीवनाधार होते. ते सतत आत्मतत्त्वाचे विवरण करत. गीता ग्रंथ त्यांच्या चिंतनाचे बलस्थान होते. शंकराचार्य आणि ज्ञानेश्वरांचे विचारधन त्यांचे पाथेय होते. शिवाजीराव भावे शिवबा धुळ्याच्या महात्मा गांधी तत्त्वज्ञान मंदिरात स्थिरावले. बाबा, तात्या आणि आबा या कौटुंबिक संबोधनांनी तिघे महाराष्ट्राला ज्ञात आहेत. कोकणातला कुलाबा जिल्हा. गाव गागोदे, नदी बाळगंगा, डोंगराचा सभोवताल. ताम्हणात पूजेसाठी देव घ्यावे तसा गाव. श्री नरसिंह कृष्णराव भावे हे आदिपुरुष. नरसिंह कृष्णराव यांचे आजोबा शिवाजी नारायण भावे. भावे कुलवृत्तांत एवढा समजतो. शिवाजीराव भावेंनी याचे वर्णन केलेय. शंभूरावांचे चार पूत्र. नरहरपंत तिस:या क्रमांकाचे चिरंजीव. त्यांचे पूत्र विनोबा, बाळकोबा, शिवाजीराव आणि कन्या शांता. शिवाजीरावांची आई कर्नाटकच्या. त्यांचे गाव हावनूर. कानडी-मराठीतील अगणित भजने आईला पाठ होती. शिवाजीरावांचे वडील नरहर पंत योगी होते. अखंड ज्ञानोपासक होते. त्यांनी आयुष्यात द्रव्यलोभ मनी धरला नाही. त्यांची एक प्रयोगशाळा होती. आपल्या अखेरच्या आजारात ते बडोदा येथे होते. विनोबांच्या सांगण्यावरून धाकटे बंधू शिवाजीराव त्यांना धुळे येथे घेऊन गेले. 29 ऑक्टोबर 1978 रोजी योग्याप्रमाणे त्यांनी देह ठेवला. अंगणातच एके ठिकाणी विनोबांनी अस्थि-विसजर्न केले. तुळशीचे रोप लावले. वृंदावन बनवले. त्यावर लिहिले. ‘अवघेचि सुखी असावे ही वासना’. एक विनोबा तर गांधी आश्रमात निघाले. पाठोपाठ मधले भाऊ-बाळकृष्ण- बाळकोबा निघाले. वध्र्याच्या घास बंगल्यात शिवाजीराव दाखल झाले. एक शेड बांधायची होती. सुताराच्या हाताखाली विनोबांनी शिवाजीरावांची नेमणूक केली. शिवाजीराव 1923 च्या ङोंडा सत्याग्रहात सामील झाले. ब्रrाविद्या मंदिर स्थापन झाले. शिवाजीराव ब्रrाविद्या- मंदिरच्या भगिनींसोबत होते. विनोबा 7 सप्टेंबर 1935 रोजी आपल्या वडिलांना लिहितात- ‘‘पूजनीय बाबांचे सेवेशी, शिवबा अखंड प्रचार करीत बाहेर हिंडत असतो आणि चातुर्मासात येथे येत असतो. गीता आणि गीताई यांचे सूक्ष्म अध्ययन करून तद्विषयक टाचणे करून ठेवणे हे त्याचे चालले आहे. त्याशिवाय थोडे फार शिकवणे. शिवबाची स्थिती ह्या 2-3 वर्षात फार पालटली आहे. पहिल्यापासून त्याचा ज्ञानाकडे कल होताच पण तो आता गीताईच्या निमित्ताने अधिक अंतमरुख झालेला आहे. प्रकृती साधारण बरी राखतो. बाळकोबाच्या तब्येतीकडे डोळ्यात तेल घालून पहात असतो. अशाप्रकारे दोघे जपा तपाला आणि ज्ञानाला वाहिले असता माङया वाटेला कर्माचा भाग आलेला आहे.’’