व्हिडीओ कॉल करुन महिलेशी अश्लिल वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:40 AM2019-03-01T11:40:29+5:302019-03-01T11:40:46+5:30

पुण्यातून एकास अटक : बोदवडच्या महिलेने केली होती तक्रार

Violence against women by video call | व्हिडीओ कॉल करुन महिलेशी अश्लिल वर्तन

व्हिडीओ कॉल करुन महिलेशी अश्लिल वर्तन

Next
ठळक मुद्देसंशयित गॅरेजवर आहे कामाला



जळगाव : व्हिडीओ कॉल करुन बोदवड तालुक्यातील एका महिलेशी अश्लिल वर्तन करणाऱ्या संदीप सिताराम कांबळे (३०, रा.गुलटेकडी, नुरानी मशिदीजवळ, पुणे) याला स्थानिक गुन्हे शाखा व बोदवड पोलिसांनी बुधवारी पुण्यातून अटक केली. त्याच्याविरुध्द विनयभंग व आयटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील महिला सरिता (काल्पनिक नाव) महिला ७ डिसेंबर २०१८ रोजी घरकाम करीत असताना एका अनोखळी क्रमांकावरुन मोबाईलवर एक कॉल आला. समोरील व्यक्तीने दोन मिनिटे तुझ्याशी बोलायचे अ सल्याचे सांगितले. त्यावर सरिता हिने मी तुला ओळखत नाही, असे सांगत फोन कट केला.
त्यानंतर थोड्याच वेळाने पुन्हा सरिता यांच्या मोबाईलवर या व्यक्तीने व्हिडीओ कॉल करुन सरिता यांच्याशी अश्लिल वर्तन केले...यावेळी त्याने स्वत: चा चेहरा दाखविला नाही. सरिता यांनी ही माहिती पती, सासु, सासरे व भाऊ यांना दिली. याप्रकरणी १४ डिसेंबर २०१८ रोजी बोदवड पोलीस स्टेशनला ३५४ (अ) (९) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या कलमान्वये गुन्हा सिध्द झाला तर तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते असे कायद्यात तरतूद आहे.
चुकून क्रमांक डायल झाला अन्..
पोलिसांनी संदीप याला अटक करुन जळगावात आणले असता त्याने नातेवाईकाला फोन लावत असताना एक क्रमांक चुकीचा डायल झाला व समोरुन तरुणीचा आवाज ऐकू आल्याने हा क्रमांक सेव्ह केला. त्यामुळे त्या क्रमांकावर संपर्क केला नंतर व्हिडीओ कॉल केल्याचे चौकशीत सांगितले. चुकीचा क्रमांक लागला नसता तर ही वेळच आली नसती, असेही तो म्हणाला. दरम्यान, संशयित संदीप हा पुण्यात गॅरेजवर काम करतो.
दोन महिन्यात शोधला विकृत
गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे आले. बोदवडचे उपनिरीक्षक अशोक उजगरे, हे.कॉ.संजय भोसले, निखील नारखेडे व सचिन चौधरी तर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी विजय पाटील, नरेंद्र वारुळे, रवींद्र गिरासे, चंद्रकांत पाटील व दिनेश बडगुजर यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यांनी केलेल्या चौकशीत व्हिडीओ कॉल करणारा संदीप सिताराम कांबळे हा असून तो पुण्यात राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बोदवडच्या पथकाने पुणे गाठून संदीप याला बुधवारी जळगावात आणले.

Web Title: Violence against women by video call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.