धरणगाव येथे लसीकरण केंद्रावर हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:51+5:302021-07-04T04:12:51+5:30

धरणगाव : येथील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या प्राथमिक शाळेच्या लसीकरण केंद्रावर शनिवारी ढिसाळ नियोजनामुळे हाणामारी ...

Violence at vaccination center at Dharangaon | धरणगाव येथे लसीकरण केंद्रावर हाणामारी

धरणगाव येथे लसीकरण केंद्रावर हाणामारी

Next

धरणगाव : येथील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या प्राथमिक शाळेच्या लसीकरण केंद्रावर शनिवारी ढिसाळ नियोजनामुळे हाणामारी झाली. एकाच दिवशी एकदा नाही तर तीन ते चार वेळेस या ठिकाणी नागरिकांनी हाणामारी केली. या दरम्यान आरोग्य कर्मचारी अविनाश चौधरीदेखील जखमी झाला आहे.

या केंद्रावर सकाळी सुमारे १५०० नागरिक लसीकरण करण्यासाठी आले होते आणि केवळ ३०० लस उपलब्ध होत्या. लसीकरणासाठी सकाळी पाच वाजेपासून रांगा लागलेल्या होत्या चेहरे बघून आरोग्य कर्मचारी नागरिकांना लस देत असल्याचा आरोप उपस्थित नागरिक करीत होते. तर नंबर लावण्यारून हाणामारीच्या घटना झाल्या. मात्र लगेच वाद मिटला. एका हाणामारीत समजूत काढताना कर्मचारी अविनाश चौधरी हा जखमी झाला. मात्र पोलिसात या घटनेची नोंद नाही.

लसीकरण केंद्रावर पहिला डोस व दुसरा डोस अशी वेगवेगळी विभागणी करून टोकन पद्धतीने करण्यात यावे, जेणेकरून नागरिकांचे हाल होणार नाहीत.

-समाधान मोरे, सामान्य नागरिक, धरणगाव

लसीकरण केंद्रावर टोकन पद्धत सुरू करावी, जेणेकरून नागरिकांचे हाल होणार नाहीत.

-संजय महाजन, ओबीसी जिल्हाध्यक्ष, भाजप धरणगाव

गेल्या चार-पाच दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने अचानक गर्दी झाल्याने अनेकांना लस देता आली नाही. नागरिकांनी सहकार्य करावे.

लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रमाणात लस कशा पद्धतीने उपलब्ध होईल ते प्रयत्न करू.

- डॉ. किरण पाटील, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी, धरणगाव

Web Title: Violence at vaccination center at Dharangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.