पहूर येथे अवैध धंद्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 09:08 PM2020-06-21T21:08:06+5:302020-06-21T21:08:41+5:30
दगडफेक : पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचारी बचावला
पहूर ता जामनेर: येथील लेलेनगर भागात दारूविक्रेत्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यावेळी एकमेकांवर दगडफेकही झाल्याने येथे पोहचलेल्या पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस कर्मचारी बचावले आहे. याप्रकरणी पहूर पोलीसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
पाचोरा रोडवरील लेलेनगर भागात भररस्त्यावर सात ते आठ ठिकाणी अवैधरित्या दारुविक्री केली जाते. या रस्त्यावरून पोलिसांसह अधिकाऱ्यांचा नेहमी वावर असून हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन व लेले विद्यालय आहे. नेहमी हा परीसर वादग्रस्त म्हणून ओळखला जातो. शनिवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली व विशेष म्हणजे त्यामहिलांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. बाटल्या, लोंखडी रॉडबरोबर दगडांचा वापर हाणामारीत झाल्याचे प्रत्यक्षदर्र्शींी सांगितल. जागेच्या वादातून हाणामारी झाल्याचे पोलीस सांगत असले तरी रहिवाशांनी दारूविक्रीचे कारण सांगितले आहे. हाणामारी सोडविताना पोउनि किरण बर्गे व पोलीस कर्मचारी ईश्वर देशमुख थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी ताफ्यासह दाखल झाले. यात दिपक प्रभाकर कुमावत, नितीन पांढरे, सचिन पांढरे, सतिष प्रभाकर कुमावत व श्याम प्रभाकर कुमावत यांना ताब्यात घेतले असून नितीन पांढरे जखमी झाला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. य्अवैधंद्यावरून हाणामारी होणे हे पोलीसांचे अपयश आहे व याला जबाबदार पोलीसच आहेत असे माजी सभापती बाबुराव घोंगडे यांनी सांगितले आहे.