दाम दुप्पट करून देण्याचे सांगत विरारच्या महिलेला साडेसात लाखाचा गंडा

By admin | Published: June 14, 2017 01:07 PM2017-06-14T13:07:33+5:302017-06-14T13:07:33+5:30

एका महिलेला साडे सात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे.

Virar's wife told him to double the cost | दाम दुप्पट करून देण्याचे सांगत विरारच्या महिलेला साडेसात लाखाचा गंडा

दाम दुप्पट करून देण्याचे सांगत विरारच्या महिलेला साडेसात लाखाचा गंडा

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 14 - जादू टोणाच्या माध्यमातून दाम दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून भडगावच्या दोन जणांनी विरार (जि.पालघर) येथील एका महिलेला साडे सात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. रज्जाक वजीर तडवी (वय 41) व गोपी मल्लु गौड (वय 60) दोन्ही रा.रा.यशवंत नगर, भडगाव या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 45 हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
जादू टोणा करुन दिलेली रक्कम दुप्पट करुन देतो असे आमिष या दोघांनी विरार येथील एका महिलेला दाखविले होते. त्यानुसार या महिलेकडून साडे सात लाख रुपयांची रोकड घेवून आम्ही स्मशानभूमीत जावून तेथील राखेच्या माध्यमातून ही रक्कम दुप्पट करतो, तुम्ही मागे या असे सांगून या दोघांनी 10 जून रोजी कारमध्ये बसून पलायन केले होते. रक्कम घेवून गेलेले बाबा परतलेच नाहीत, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने विरार पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर गंडा घालणारे रज्जाक तडवी व गोपी गौड हे भडगाव येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तेथील पोलिसांनी जळगाव पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी मंगळवारी एक पथक संशयितांच्या शोधासाठी पाठविले होते. या पथकाने दोघांना बसस्थानक परिसरातच घेरले. दोघांजवळून 1 लाख 45 हजाराची रक्कम हस्तगत करण्यात आली. दरम्यान, खामगाव येथील मौलानाच्या सांगण्यावरुन आम्ही विरार येथे गेलो होतो असे त्यांनी चौकशीत सांगितले. दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, या मौलानालाही आरोपी केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

Web Title: Virar's wife told him to double the cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.