जानेवारी मध्ये विष्णुयाग महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 06:07 PM2019-12-12T18:07:57+5:302019-12-12T18:08:06+5:30
फैजपूर : येथे २६ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान भव्य विष्णुयाग महोत्सव व नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन केले असून हा ...
फैजपूर : येथे २६ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान भव्य विष्णुयाग महोत्सव व नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन केले असून हा कार्यक्रम भव्य दिव्य होणार आहे.
याकरिता सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी कार्यकर्ते यांची सभा नुकतीच प. पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज व प. पू. महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज यांच्या उपस्थितीत झाली. सभेत समितीचे सचिव व मसाका संचालक नरेन्द्र नारखेडे यांनी आढावा मांडला.
२६ जानेवारी ते ३ फेब्रुवारी याकाळात २७ कुंडी विष्णुयाग होईल. दररोज गाथा पारायण व दुपारी ३ ते ५ प. पू.चैतन्य महाराज देगलूरकर यांचे योगी पावन मनाचा याविषयावर प्रवचने होतील. रात्री आळंदी व पंढरपूर येथील थोर कीर्तनकार यांची कीर्तने होईल. या महोत्सवात महाराष्ट्रातील थोर साधू व संत तसेच नाशिक, त्रंबकेश्वर, काशी ,चेन्नई व फैजपुर येथील ब्राह्मण उपस्थित राहणार आहे. प. पू. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे काल्याचे कीर्तनाच्या कार्यक्रमाची सांगता होईल. या महोत्सवाचे आयोजन प. पू. प्रसाद महाराज अमळनेरकर यांचे प्रमुख उपस्थितीत होईल. मार्गदर्शन प. पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज व प. पू. महामंडलेश्वर पुरुषोत्तम महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर कार्यक्रमास प. पू. महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज यांनी खंडोबा मंदिराचा हॉल व आवार विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. सभेला उपस्थित भाविक व कार्यकर्ते यांनी देणगी जाहीर करून कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात पार पडण्याची संकल्प केला. यज्ञासाठी भाविकांनी नांवे नोंद करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. चोलदास पाटील, विजय परदेशी, अनिल नारखेडे, सुनील नारखेडे , योगेश भावसार, डॉ गणेश भारबे, उमेश चौधरी, सुनील पाटील, नितीन महाजन, किशोर गुजराती, हिरामण भिरुड, पंडित कोल्हे, सुशील जैसवाल, हेमा भंगाळे, राहुल साळी, काशिनाथ वारके, किशोर कोल्हे, प्रवीण महाराज यांची उपस्थिती होती.