जगणं आणि वास्तवतेचे कवितेतून दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:15 AM2021-04-14T04:15:02+5:302021-04-14T04:15:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सत्यशोधकी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन कविसंमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीय कायदेमंत्री रमाकांत खलप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सत्यशोधकी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन कविसंमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीय कायदेमंत्री रमाकांत खलप यांनी केले. यावेळी त्यांनी महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सुधारणा या कवितांतून येणे म्हणजेच पिढ्यांना महापुरुषांकडे नेणे होय, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
‘जगणं आणि वास्तवता’ या कवितातून मांडताना समाज समाजातली माणसं समाजातील दुःख, समाजातील दारिद्र्य त्याचबरोबर समाजाला दिशा दाखवणारे साहित्यही आले पाहिजे. ते साहित्य चिरकाल टिकणारे असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उद्योग विभागाचे आयुक्त हर्षदीप कांबळे उपस्थित होते. त्यांनी मनोगत व्यक्त केले. कवी संमेलनाचे अध्यक्ष राज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्रा. डॉ.केशव सखाराम देशमुख होते. त्यांनी परिवर्तन वादाचा एल्गार सामाजिक परिवर्तनाची कविता या कविसंमेलनातून मांडली गेल्याचे म्हटले.
यावेळी उदगीर महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजकुमार मस्के, नगरसेवक सचिन पाटील, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल यांनी केले.
कविसंमेलनात प्रा. डॉ. मंगेश बनसोड( मुंबई ),प्रा. डॉ. यशवंत राऊत (धारवाड), शेषराव धांडे (वाशिम), योगिनी राऊळ (मुंबई ),सुरेश साबळे (बुलढाणा ),प्रा. डॉ. सारिपुत्त तुपेरे (सोलापूर), प्रा. डॉ. सत्यजित साळवे (जळगाव )प्रा. डॉ. भास्कर पाटील (अकोला), प्रा. डॉ. अशोक इंगळे (अकोला), रमेश पवार (अमळनेर), विलास मोरे( एरंडोल) भारत गायकवाड( उदगीर) प्रा. बी. एन. चौधरी (धरणगाव), प्रा. डॉ. सतीश म्हस्के (पिंपळनेर), अर्जुन व्हटकर (सोलापूर ),राजेंद्र पारे(चोपडा), महेंद्र गायकवाड (नागपूर) प्रा. डॉ. सुनील भडांगे (पालघर), प्रा. डॉ. रुपेश कराडे (यवतमाळ), प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर( जळगाव ) ,राहुल निकम (जळगाव ) प्रा. डॉ.रवींद्र मुरमाडे (चंद्रपूर), दिनेश चव्हाण, (चाळीसगाव), संजय घाडगे (लातूर) प्रा.डॉ. संजय कांबळे (बेळगाव) यांनी सहभाग घेतला. आभार सुरेश साबळे यांनी मानले.