जि.प.सीईओंची एरंडोल पं.स.ला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:04 PM2019-02-08T23:04:09+5:302019-02-08T23:04:46+5:30
सौर ऊर्जेचा वापराविषयी सूचना
एरंडोल : जिल्हा परिषदेच्या शाळा १०० टक्के डिजिटल करा त्यासाठी निधी कमी पडत असल्यास मागणीचा प्रस्ताव दोन दिवसात पाठवा, अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी शुक्रवारी एरंडोल पंचायत समितीला भेटी केली.
याप्रसंगी डॉ. पाटील यांनी विविध योजनांच्या कामाचा आढावा घेतला तसेच पंचायत समितीच्या विविध भागांना भेट देऊन पाहणी केली. जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर ऊर्जेच्या वापरावर जोर दिला. त्यासाठी त्वरित प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी दिल्या.
या वेळी घरकुलांचाही आढावा घेण्यात आला. वाळू उपलब्ध नसल्यामुळे घरकुलांचे बांधकाम रखडले आह, अशी अडचण गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे (पवार) यांनी मांडली.
जुन्या कृषी विभागाच्या दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित करून ध्वजांकित कार्यक्रमाचीही माहिती जाणून घेण्यात आली. ‘जलयुक्त शिवार’, ‘आमच्या गाव आमचा विकास’, ‘स्वच्छ भारत अभियान’ इत्यादी कामाबाबत डॉ.पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
या भेटीत डॉ. पाटील यांनी विविध विकास योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा घेतला. गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे (पवार) यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांचे स्वागत केले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी एन.एफ. चौधरी व नीलेश पालवे हे उपस्थित होते.
या वेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.