कोल्हापूरच्या सद्गुरूंची मुक्ताबाई मंदिरास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 04:11 PM2018-09-30T16:11:50+5:302018-09-30T16:14:30+5:30
कोल्हापूर येथील सद्गुरू विश्वनाथ महाराज रूकडीकर मठाचे प्रमुख प.पू.आनंदनाथ महाराज, पुण्याचे प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य समीर जमदग्नी व रामराया सांगवडेकर महाराज, वैद्य प्रवीण पाटील यांनी शनिवारी संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी मुक्ताईनगर येथे सदिच्छा भेट दिली.
मुक्ताईनगर : कोल्हापूर येथील सद्गुरू विश्वनाथ महाराज रूकडीकर मठाचे प्रमुख प.पू.आनंदनाथ महाराज, पुण्याचे प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य समीर जमदग्नी व रामराया सांगवडेकर महाराज, वैद्य प्रवीण पाटील यांनी शनिवारी संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी मुक्ताईनगर येथे सदिच्छा भेट दिली.
आदिशक्ती मुक्ताबाई पाद्यपूजा व स्तोत्र पठण केले. यावेळी संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील व बºहाणपूर भागातील आयुर्वेद डॉक्टर व भक्तपरिवार उपस्थित होता.
कोल्हापूर मठातर्फे दरमहा वैद्य एकादशी वारीस मोफत आरोग्य तपासणी, औषधे, शिबिरे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक संतांच्या समाधीस्थळी १७ ठिकाणी आयोजन होते. सन २०१५ पासून मुक्ताईनगर येथेसुद्धा शिबिर आयोजित केले जाते. रूकडीकर मठ कोल्हापूर भक्त परिवारातर्फे मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर येथे आगामी काळात सप्ताहाचे आयोजन करू, असे मनोगत रामराया महाराज सांगवडेकर यांनी सांगितले.