गुरूंना कार भेट देऊन कृतज्ञतेचे दर्शन

By admin | Published: January 21, 2017 12:38 AM2017-01-21T00:38:53+5:302017-01-21T00:38:53+5:30

तनयने पाळले वचन : लवकरच सेवाभावी संस्थांनाही देणार रक्कम

Visiting the car with gratitude by visiting the car | गुरूंना कार भेट देऊन कृतज्ञतेचे दर्शन

गुरूंना कार भेट देऊन कृतज्ञतेचे दर्शन

Next

जळगाव : ‘डान्स आयकॉन’ ठरलेल्या तनय मल्हारा याला ‘डान्स प्लस २’ या खासगी वाहिनीवरील नृत्य स्पर्धेचा विजेता झाल्यानंतर बक्षीस म्हणून मिळालेली कार तनयने शुक्रवारी आपले गुरू अखिलेश तिलकपुरे यांना भेट दिली व गुरूंबद्दल कृतज्ञतेचे दर्शन घडविले.
 विजेता झाल्यानंतर जळगावात आयोजित कार्यक्रमात तनयने ही कार  गुरुदक्षिणा म्हणून आपल्या गुरूंना भेट देण्याचे जाहीर वचन जळगावकरांसमोर दिले होते. त्यानुसार  तनयने ही कार शुक्रवारी सेंट टेरेसा शाळेत आयोजित समारंभात गुरू अखिलेश तिलकपुरे यांना भेट दिली. या वेळी तनयने समाज, गुरू व जळगावकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या शालेय मित्रांसमोर त्याने आदर्श उदाहरण उभे केले. त्याच्या या कृतज्ञतेचे सर्वांनी कौतुक केले.
या वेळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष  अशोक जैन, आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक रतनलाल सी. बाफना,  महापौर नितीन लढ्ढा, तनयचे वडील व मल्हार कम्युनिकेशन्सचे संचालक आनंद मल्हारा, सेंट टेरेसा स्कूलच्या प्राचार्या ज्युलीट, सिस्टर मर्सी आदी उपस्थित होते.
तनय आपल्या आजोबांच्या ‘समाजाप्रती देणे लागतो’ या जाणिवेला जाणून व जगून आपली वाटचाल करत आहे. एवढे यश संपादन करूनही तनयच्या डोक्यात यशाची हवा गेली नसून त्याचे पाय आजही जमिनीवर आहेत आणि समाजाशी त्याची नाळ आताही जुळून आहे, हे पाहून धन्य वाटले’ अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. सूत्रसंचालन मनोज डोंगरे यांनी केले.
बक्षिसातील रक्कम लवकरच सेवाभावी संस्थांना दान
विजेता झाल्यानंतर बक्षीस म्हणून मिळालेल्या रकमेपैकी काही रक्कम  येथील सामाजिक संस्थांना दान करण्याचे वचन तनयने दिले होते. रक्कम अजून वाहिनीतर्फे मिळालेली नसून ती लवकरच मिळणार आहे. ती मिळाल्यानंतर लवकरच संस्थांना दान करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
या वेळी बोलताना अशोक जैन म्हणाले की, तनय हा एक चांगला कलाकार, खेळाडू, विद्यार्थी तर आहेच, याशिवाय तो एक चांगला व्यक्तीही आहे. तो जळगावचे नाव आणखी देशभरात पोहोचवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Visiting the car with gratitude by visiting the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.