अभ्यागतांना सर्व शासकीय कार्यालयात प्रवेशास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:16 AM2021-04-08T04:16:51+5:302021-04-08T04:16:51+5:30

जळगाव : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि शासकीय महामंडळे येथे अभ्यागतांना ३० एप्रिल, २०२१ पर्यंत प्रवेशास मनाई करण्याचे ...

Visitors are barred from entering all government offices | अभ्यागतांना सर्व शासकीय कार्यालयात प्रवेशास मनाई

अभ्यागतांना सर्व शासकीय कार्यालयात प्रवेशास मनाई

Next

जळगाव : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि शासकीय महामंडळे येथे अभ्यागतांना ३० एप्रिल, २०२१ पर्यंत प्रवेशास मनाई करण्याचे आणि अभ्यागतांसाठी ऑनलाइन सेवा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

अपवादात्मक परिस्थितीत ४८ तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्यास शासकीय कार्यालयाच्या विभाग प्रमुखाच्या परवानगीने अभ्यागतांना पास देऊन प्रवेश निश्चिती करण्यात येईल. कोविड १९ची भीती न बाळगता, शासनास कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेणे सोईस्कर व्हावे, यासाठी भारत सरकारच्या निर्देशानुसार सर्व शासकीय आणि खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाशी संबंधित अर्ज, वैयक्तिक निवेदने, खुलासा व सूचना नागरिकांनी ईमेलवर सादर करावे. शासकीय कार्यालयात बाहेरून येणारे टपाल एकाच ठिकाणी देण्यात यावे. कोणीही अभ्यागत थेट कार्यालयात प्रत्यक्षरीत्या जाणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती करावी, अत्यावश्यक/तातडीच्या बैठका प्रत्यक्ष उपस्थितीत पार पाडताना, एका विभागाचा एकच अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहील, याची दक्षता घ्यावी. तातडीच्या बैठका वगळता अन्य बैठका ऑनलाइन घेण्यात याव्यात, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.

Web Title: Visitors are barred from entering all government offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.