पातोंडा येथे विठ्ठल-रुखमाई पालखी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:13 AM2021-07-21T04:13:44+5:302021-07-21T04:13:44+5:30

पातोंडा, ता. अमळनेर : आषाढी एकादशी निमित्ताने पातोंडा येथे दरवर्षी विठ्ठल-रुखमाई पालखी सोहळा साजरा करण्यात येत असतो. हा पालखी ...

Vitthal-Rukhmai Palkhi Ceremony at Patonda | पातोंडा येथे विठ्ठल-रुखमाई पालखी सोहळा

पातोंडा येथे विठ्ठल-रुखमाई पालखी सोहळा

Next

पातोंडा, ता. अमळनेर : आषाढी एकादशी निमित्ताने पातोंडा येथे दरवर्षी विठ्ठल-रुखमाई पालखी सोहळा साजरा करण्यात येत असतो. हा पालखी सोहळा ‘गरीबनाथ महाराज’ या नावाने निघत असतो. यंदाही सर्व नियमांचे पालन करत ‘बोला गरीबनाथ महाराज की जय’ या जयघोषाने श्री विठ्ठल- रुखमाईचा पालखी सोहळा सांप्रदायिक परंपरेनुसार मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पालखी सोहळ्याची २५० वर्षांपूर्वीची प्राचीन परंपरा आजही मोठ्या उत्साहात टिकून आहे.

येथे प्राचीन विठ्ठल मंदिर असून यामध्ये सुंदर व सुरेख दगडाची कोरीव विठ्ठल व रुखमाई यांची मूर्ती आहे. विठ्ठल-रुखमाईंना चांदीचे मुकुट चढविण्यात आला आहे. मंदिर अडीचशे वर्षांपूर्वीचे समजते. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या भक्तिमय वातावरणात, टाळ-मृदुंग व अभंगवाणीने पालखी सोहळा काढण्यात आला. पालखी मिरवणुकीला सायंकाळी ५ वाजता विठ्ठल मंदिरापासून सुरुवात होऊन, रात्री ८ वाजेपर्यंत हा सोहळा सुरू होता. पालखी सुसज्ज सजवण्यात आली होती. पालखीत विठ्ठल-रुखमाई यांची मूर्तीही ठेवण्यात आल्या होत्या. मिरवणुकीच्या वेळी सुहासिनी व भाविकांनी आरती व विठ्ठल दर्शन घेतले. दारोदारी व चौकाचौकातून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. पालखी खांद्यावर वाहून नेण्याचा मान परंपरेनुसार गावातील भोई समाज बांधवांना देण्यात आला.

Web Title: Vitthal-Rukhmai Palkhi Ceremony at Patonda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.