विव:यातील महिलांचा रुद्रावतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 04:58 PM2017-09-20T16:58:53+5:302017-09-20T17:03:13+5:30
विवरे गावात दारूबंदी करावी यासाठी महिलांनी रुद्रावतार धारण करीत मंगळवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली.
ऑनलाईन लोकमत
विवरे, ता.रावेर,दि.20 - विवरे गावात दारूबंदी करावी यासाठी महिलांनी रुद्रावतार धारण करीत मंगळवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. अवैध दारुविक्री व गावात संपूर्ण दारुबंदी करावी या मागणीचे निवेदन ग्रा.पं.प्रशासनाला दिले.
ग्रामपंचायत विवरे बु.।। व विवरे खु.।। या दोन्ही ग्रामपंचायतीवर महिलांनी लेखी अर्ज देऊन गावात संपूर्ण दारु बंदी करावी अशी मागणी केली. गावात मद्य प्राशन करीत हाणामारीचे प्रमाण वाढले आहे. गावात अल्पवयीन मुलांपासून ते ज्येष्ठांर्पयत बहुतांश नागरिकांना दारुचे व्यसन आहे. लोक दारुच्या आहारी गेल्यामुळे महिला वर्गाला घरात त्रास सहन करावा लागत आहे, अशा स्वरुपाचा तक्रार अर्ज महिलांनी ग्रामपंचायतीला दिला आहे. दारुबंदीमुळे अनेकांचे उद्ध्वस्त होणारे संसार सावरता येतील. अवैध दारु विक्री करणा:यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली. दखल न घेतल्यास संपूर्ण गावातील महिला मोर्चा काढून दारुबंदीसाठी रस्त्यावर उतरू असे असा इशारा दिला.