विवरे बुद्रूक उपसरपंचांचा राजीनामा नामंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:47+5:302021-06-05T04:12:47+5:30
विवरे, ता.रावेर : विवरे विवरे बुद्रुक उपसरपंच भाग्यश्री पाटील यांनी दाबावापोटी दिलेला राजीनामा नामंजूर करण्यात आला. रावेर तालुक्याच्या ...
विवरे, ता.रावेर : विवरे विवरे बुद्रुक उपसरपंच भाग्यश्री पाटील यांनी दाबावापोटी दिलेला राजीनामा नामंजूर करण्यात आला.
रावेर तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाच्या ठरणाऱ्या विवरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक सत्ताधारी गटप्रमुख वासुदेव नरवाडे व विरोधी गटप्रमुख विपीन राणे, शिवाजी पाटील यांच्यात वर्चस्वासाठी जिकिरीची ठरली.
१२ फेबुवारी रोजी उपसरपंच नीलिमा सणंसे यांची निवड होऊन, २३ एप्रिल रोजी राजीनामा दिल्याने मंजूर करण्यात आला होता. या रिक्त पदासाठी ६ मे रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत सत्ताधारी पॅनलप्रमुख वासुदेव नरवाडे यांनी विरोधी गटाला सुरुंग लावल्याने भाग्यश्री विकास पाटील उपसरपंच झाल्या, परंतु विरोधकांनी गोंधळ घालून व दबाव टाकून लगेच दोन दिवसांत ८ मे रोजी राजीनामा सरपंचांसमोर ठेवला. त्या राजीनाम्याच्या पडताळणीसाठी ३१ मे रोजी मासिक सभा घेण्यात आली. ही मासिक बैठक कोरमअभावी तहकूब करण्यात आल्याने २ जून रोजी विशेष बैठक सरपंच युनूस तडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीत ८ मे रोजी दिलेला राजीनामा मानसिक स्वास्थ ठिक नसल्याने, दबावापोटी भीतीने दिला असल्याने मंजूर करण्यात येऊ नये, असे उपसरपंच भाग्यश्री पाटील यांनी लेखी पत्राद्वारे सांगितल्याने, उपसरपंचपदाचा राजीनामा नाकारण्यात आला. पॅनलप्रमुख वासुदेव नरवाडे यांचे वर्चस्व सिद्ध झाल्यामुळे विनोद मोरे हेही विरोधकांना सोडचिठ्ठी देऊन नरवाडे गटात सामील झाल्याने, त्यांचे शाल, श्रीफळ देऊन सदस्या रेखा गाढे यांनी स्वागत केले.
यावेळी सरपंच युनूस तडवी, वासुदेव नरवाडे , युसुफ खाटीक, रेखा गाढे, स्नेहा पाचपांडे, नौशादबी इस्माईलखा, विनोद मोरे, ज्योती सपकाळ, इस्माईलखा इब्राहिमखा, विकास पाटील, भागवत महाजन, गणेश सपकाळ यासह ग्रामस्थ उपस्थित होते.