विवेक ठाकरेच होता अवसायक कंडारेचा हस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:27 AM2020-12-03T04:27:56+5:302020-12-03T04:27:56+5:30

जळगाव : अवसायकाच्या काळात बीएचआरमधील गैरप्रकारात ठेवीदारांचा नेता म्हणून मिरवणारा विवेक ठाकरे हाच अवसायक जितेंद्र कंडारे याचा हस्तक असल्याचे ...

Vivek Thackeray was the handmaiden of Avasayak Kandare | विवेक ठाकरेच होता अवसायक कंडारेचा हस्तक

विवेक ठाकरेच होता अवसायक कंडारेचा हस्तक

googlenewsNext

जळगाव : अवसायकाच्या काळात बीएचआरमधील गैरप्रकारात ठेवीदारांचा नेता म्हणून मिरवणारा विवेक ठाकरे हाच अवसायक जितेंद्र कंडारे याचा हस्तक असल्याचे उघड झाले असून सुनील झंवर, नीलेश भोईट व विरेंद्र भोईटे हे ठेवीदारांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप पुण्यात अपहार व फसवणुकीची तक्रार देणाऱ्या रंजना खंडेराव घोरपडे (६५, रा.भोसले नगर, पुणे) यांनी केला आहे. फिर्यादीत देखील तसे नमूद करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक ठाकरे हा कर्जदार, ठेवीदारा समन्वयक समितीची सभा घेण्यासाठी पुण्यात जायचा. ठाकरे व त्याच्यासोबतचे काही लोक सभेत ठेवी बुडण्याच्या भीतीचे वातावरण निर्माण करीत होते. ठाकरे याच्या भीतीमुळे रंजना घारेपडे पुण्याहून जळगावात आल्या असता त्यांना कंडारेंच्या कार्यालयात तासनतास बसवून ठेवले जायचे. वारंवार विनंती केल्यानंतर कंडारेची भेट व्हायची. विवेक ठाकरे हा कंडारेंचा हस्तक असल्याचे तेव्हा समजले. कंडारेंच्या भेटीतही त्याने विवेक ठाकरे हे तुम्हाला पुण्यात येऊन भेटतील असे सांगण्यात आले. या कामासाठी ठाकरे १८ हजार ६०० रुपये दोन गुंतवणूकदारांकडून घेतले.

शपथपत्र दिले नाही म्हणून भोईटेंकडून धमकीठेवीदारांचे पैसे काढण्यासाठी नीलेश भोईटे, विरेंद्र भोईटे असे अनेक दलाल आहेत. ते ऑक्टोबर, नोव्हेंबर २०१६ मध्ये पुण्यात गेले होते. या दोघांनी रंजना घोरपडे यांना मुळ पावत्या व शपथपत्राची मागणी केली, मात्र त्यांनी नकार दिला असता घोरपडे यांना ठार मारण्याची धमकी देण्यासह पैसेही मिळणार नसल्याचा दम दिला.

झंवर म्हणाला, पैसे मिळणार नाही, काय करायचे ते कर

ऑक्टोबर २०१९ मध्ये रंजना घोरपडे या परत जळगावात आल्या व कंडारेंकडे पैशाची मागणी केली. तेव्हाही कंडारेने १०० टक्के रक्कम मिळाल्याचे शपथपत्र दिल्याशिवाय पैसे मिळणार नसल्याचे सांगितले. तेव्हा सुनील झंवर याने तुला पैसे मिळणार नाहीत, जे काय करायचे ते कर असे सांगून दम दिला.

बीएचआर प्रकरणात ५ डिसेंबर रोजी सुनावणी

बीएचआर पतसंस्थेकडून झालेल्या फसवणूक प्रकरणात अटकेतील प्रमोद रायसोनीसह १३ संचालकांबाबत ५ डिसेंबर रोजी जिल्हा सत्र न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून सुनावणी होणार आहे.

Web Title: Vivek Thackeray was the handmaiden of Avasayak Kandare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.