स्वेच्छा रक्तदान दिन : रक्तदानाकडे महिलांचा कल वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:33 PM2019-10-01T12:33:07+5:302019-10-01T12:33:11+5:30

चार वर्षात संख्या वाढली ; स्वयंस्फूर्तीने रक्तदान

Voluntary Blood Donation Day: Women's attitude towards blood donation increased | स्वेच्छा रक्तदान दिन : रक्तदानाकडे महिलांचा कल वाढला

स्वेच्छा रक्तदान दिन : रक्तदानाकडे महिलांचा कल वाढला

googlenewsNext

जळगाव : ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ अशी वारंवार दिली जाणारी हाक व होणारी जनजागृती बघता रक्तदानाकडे महिला वर्गाचाही कल वाढला असून गेल्या चार वर्षात महिला रक्तदात्यांची संख्या वाढली आहे़
१ आॅक्टोबर हा जागतिक स्वेच्छा रक्तदान दिन आहे़ तुम्ही दिलेले रक्त कुणालतरी वाचवू शकते हा संदेश सामाजिक संस्था, शासकीय यंत्रणेमार्फ वारंवार दिला जातो़ रक्तदात्यांची संख्या वाढून कोण्या रूग्णाचा रक्ताअभावी मृत्यू होऊ नये, हा त्या मागचा उद्देश असतो़ अशा स्थितीत अनेक संस्थां, व्यक्तिंकडूनही रक्तदानासाठी प्रोत्साहित केले जाते़ आधी रक्तदानाला घाबरणाऱ्या व रक्तदान न करणाºया महिला आता काळानुरूप प्रबोधन झाल्याने रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करतात़
गेल्या चार वर्षात महिला रक्तदात्यांची संख्या वाढल्याची माहिती रेड क्रॉस सोसायटीतून मिळाली़ पुरूष रक्तदात्यांच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी वर्षानुसार ही संख्या वाढत आहे़ गावागावात रक्तदानासाठी शिबिर लावल्यानंतर आधी एकही महिला रक्तदानासाठी येत नव्हती मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून आता महिला स्वत: रांग लावून रक्तदानासाठी येत असतात, असेही रेडक्रॉस सोसायटीकडून सांगण्यात आले़

Web Title: Voluntary Blood Donation Day: Women's attitude towards blood donation increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव