होमिओपॅथीक डॉक्टरांची कोविडमध्ये स्वेच्छेने सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:51 AM2020-06-09T11:51:42+5:302020-06-09T11:51:54+5:30
रुग्णांना औषधी देण्यास परवागनी : गंभीर रुग्ण बरे होण्याचा विश्वास, पाचोरा पॅटर्न शहरात राबविणार
जळगाव : पाचोरा, भडगावात होमिओपॅथीचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर आता हे औषधोपचार जळगावात दाखल रुग्णांवरही करण्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून होमीओपॅथीक डॉक्टरर्सना परवानगी मिळाली आहे़ अनेक डॉक्टरांनी सेवेची इच्छा व्यक्त केली होती, ती मान्य झाल्याने या डॉक्टरांनी रविवारपासून कोविड रुग्णालया कामही सुरू केले आहे़
डॉ. रवी हिरानी व डॉ. तृप्ती बढे हे आयुष विभाग वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेतच यासह डॉ़ जानकीराम तळेले, डॉ प्रमोद जोशी, डॉ़ कमलेश मराठे, डॉ़ ज्योती हिरानी, डॉ़ सचिन पाटील, डॉ़ यशवंत पाटील, डॉ़ अमित वर्मा यांनी या ठिकाणी सेवा देण्याची इच्छा वर्तविली होती़ त्यानुसार परवानगी देण्यात आली आहे़ दरम्यान, जळगावचा वाढता मृत्यू दर बघता गंभीर रुग्णांना ही औषधी दिल्यास ते बरे होण्याचे प्रमाण निश्चितच वाढेल तसा आम्ही पूर्ण करू असा विश्वास डॉ़ रवी हिरानी यांनी व्यक्त केला आहे़ अॅलीओपॅथीच्या औषधे सुरू ठेवून त्यांच्या बरोबर ही होमिओपॅथीची औषधे देण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली़
असे होतात औषधोपचार
- रुग्णांच्या आवडीनिवडी, त्यांच्या सवयी त्यांचा स्वभाव हे बघून त्याची तपासणी करून, रुग्णाशी संवाद साधून ही माहिती घेऊन त्यानुसार रुग्णांना औषधी देण्यात येत असते़ जिल्ह्यातील पाचोरा येथे हा प्रयोग यशस्वी झाला होता़ अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले होते़ तोच प्रयोग जळगावात राबविण्यात येणार आहे़