रांगोळीतून मतदार जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:06 AM2019-10-01T00:06:03+5:302019-10-01T00:06:08+5:30
अमळनेर : निवडणूक स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीसाठी पर्ल इंग्लिश मीडियम स्कूल व ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये मतदान प्रक्रिया समजाविण्यात आली. ...
अमळनेर : निवडणूक स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीसाठी पर्ल इंग्लिश मीडियम स्कूल व ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये मतदान प्रक्रिया समजाविण्यात आली. तसेच रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. मतदानाची गोपनीयता, प्रचार, प्रसिद्धी, विविध टप्पे आदींबाबत जनजागृती केली. यासाठी चेअरमन चंद्रकांत भदाणे व प्राचार्या ज्योती सुहागिर यांचे मार्गदर्शन लाभले. एन.टी.मुंदडा ग्लोबल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची मतदार जागृतीवर रांगोळी स्पर्धा घेतली. विद्यार्थ्यांनी विविध रांगोळ््यांतून जागृतिपर संदेश दिले.
चेअरमन प्रकाश मुंदडा व प्राचार्य लक्ष्मण, प्राचार्या विद्या लक्ष्मण यांचे मार्गदर्शन लाभले. प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.