६८९ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:13 AM2021-01-15T04:13:53+5:302021-01-15T04:13:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकांचे वातावरण तापले असून शुक्रवारी १५ जानेवारीला जिल्ह्यातील ६९० ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार ...

Voting for 689 villagers today | ६८९ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

६८९ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकांचे वातावरण तापले असून शुक्रवारी १५ जानेवारीला जिल्ह्यातील ६९० ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी साडे सात ते साडे पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. राजकीय यंत्रणा सज्ज असताना प्रशासकीय यंत्रणेनेही सज्जतेचा नारा दिला असून सर्व यंत्र सामुग्री, पोलिसांचा ताफा रवाना करण्यात आला आहे.

७८३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्यातील ९२ ग्रामपंचातींनी बिनविरोधचा आदर्श ठेवला असून उर्वरित ६८९ ग्रामपंचातींसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात ७ हजार २१३ उमेदवार रिंगणात असून २४१५ केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक तालुक्याला साधारण एक हजारावर अधिकारी कर्मचारी असे साधारण पंधरा हजारांवर अधिकारी कर्मचारी या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेली आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी असेल दक्षता

मतदानासाठी आलेल्यांमध्ये अंतर ठेवूनच रांगेत उभे केले जाणार आहे. गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. प्रत्येक कर्मचारी हे मास्क परिधान करूनच असतील. बाधित मतदारांना जर मतदानाची इच्छा असेल तर त्यांना वेळ संपल्यानंतरच्या अर्ध्या तासात मतदान करता येणार आहे. अशा प्रकारची दक्षता प्रत्येक केंद्रावर घेतली जाणार आहे.

कोट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रोटोकॉल आणि दक्षतेनेच मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. बाधित मतदारांसाठी शेवटी अर्धा तास वेळ दिला जाणार आहे. शेवटच्या मतदाराचे मतदान संपल्यानंतर हा अर्धा तास असेल. प्रत्येक कर्मचारी हे मास्क परिधान करूनच कर्तव्यावर असतील. - नामदेव पाटील, तहसीलदार, जळगाव

पोलीस बंदोबस्त

ग्रामपंचायत निवडणुका या शांततेत व निर्भयपूर्ण वातावरणात पार पडाव्यात यासाठी २४१५ मतदान केंद्रांवर पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. दोन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आढावाही घेतला. बुधवारी १३ रोजीच हा बंदोबस्त रवाना करण्यात आला आहे. ८ पोलीस उपअधीक्षक, १९ पाेलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त तैनात राहणार आहे.

महिला पोलीस - १९१

पुरूष पोलीस १४९५

सोमवारी निकाल

ग्रामपंचातय निवडणुकीचा निकाल हा सोमवारी १८ जानेवारी त्यात्या तालुक्याच्या ठिकाणी जाहीर होणार आहे. यासाठीही यंत्रणेची तयारी करण्यात आली आहे. मतदान व निकाल यात दोन दिवसांचे अंतर असल्याने सुरक्षा व्यवस्थाही कडक राहणार असल्याची माहिती आहे.

दोन ग्रामपंचातीत मतदान नाही

नशिराबाद ग्रामपंचायतीच्या ८२ पैकी ८१ उमेदवारांनी माघार घेतली होती. या ठिकाणची एक जागा बिनविरोध निवडून आली. तर पाचोऱ्या तालुक्यातीलही एका ग्रामपंचायतीसाठी एकूण जागांपैकी काही जागांसाठी वैध नामनिर्देशन पत्र अपात्र असल्यामुळे व उर्वरित जागा बिनविरोध झाल्यामुळे प्रत्यक्ष मतदान न होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या दोनवर पोहचली आहे.

अशी आहे निवडणूक

ग्रामपंचायत संख्या - ७८३

एकूण प्रभाग संख्या - २६७०

रिंगणातील उमेदवार - ७२१३

महिला उमेदवार - ६१९ (जळगाव तालुका)

एकूण मतदान केंद्र -२४१५

अधिकारी संख्या -७५० (जळगाव तालुका)

कर्मचारी संख्या - १९० (जळगाव तालुका)

बिनविरोध गावे

जळगाव - २

जामनेर - ४

धरणगाव-९

एरंडोल- ८

पारोळा - १२

भुसावळ - २

मुक्ताईनगर- ४

बोदवड- २

यावल-०

रावेर- ०

अमळनेर -१४

चोपडा -१०

पारोळा -११

भडगाव -४

चाळीसगाव - १०

तालुकानिहाय ग्रामपंचायती

जळगाव - ४३

जामनेर - ७३

धरणगाव-४७

एरंडोल- ३७

पारोळा - ५८

भुसावळ - २६

मुक्ताईनगर- ५१

बोदवड- २९

यावल- ४७

रावेर- ४८

अमळनेर - ६७

चोपडा - ५२

पारोळा -९६

भडगाव -३३

चाळीसगाव - ७३

Web Title: Voting for 689 villagers today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.