खान्देशातील २० पैकी १६ मतदारसंघात मतदानात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:15 PM2019-10-23T12:15:15+5:302019-10-23T12:16:40+5:30

४ मतदारसंघात वाढला टक्का : सर्वाधिक १०.०३ टक्के घट जळगाव मतदारसंघात

Voting decreases in 4 out of 5 constituencies in Khandesh | खान्देशातील २० पैकी १६ मतदारसंघात मतदानात घट

खान्देशातील २० पैकी १६ मतदारसंघात मतदानात घट

Next

जळगाव : विधानसभा निवडणुकीत खान्देशातील २० मतदार संघांपैकी तब्बल १६ मतदार संघांमध्ये गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत घट झाली आहे. तर ४ मतदार संघात मतदानाचा टक्का वाढला आहे. सर्वात कमी ४५.१३ टक्के मतदान जळगाव शहर मतदार संघात झाले आहे. तर सर्वाधिक ७५.३७ टक्के मतदान नवापूर मतदार संघात झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदाना २१ रोजी पार पडले. मात्र यंदा गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र दिसून आले.
मतदारांनी मतदानाकडे पाठ का फिरविली? असा प्रश्न यामुळे प्रशासन व राजकारण्यांसमोर उपस्थित झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात ६०.९० टक्के मतदान
जळगाव जिल्ह्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ६४.२८ टक्के मतदान झाले होते. मात्र यंदा एकूण ६०.९० टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातच एकूण मतदानाच्या टक्केवारीत घट झाली आहे. त्यात जळगाव शहरात सर्वात कमी ४५.१३ टक्केच मतदान झाले आहे.
शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, खोदकामामुळे पडून असलेल्या मातीचा पावसामुळे झालेला चिखल यामुळे मतदारांनी घराबाहेर पडण्याचा कंटाळा केल्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. तर मतदार स्लिपचे वाटप पूर्णपणे न झाल्याचा फटकाही बसल्याचे मानले जात आहे.
सर्वाधिक ६८.७२ टक्के मतदान रावेर मतदार संघात झाले आहे. त्यामुळे कमी मतदानाचा व जास्त मतदानाचा फटका विद्यमान आमदारांना बसणार का? अशी चर्चाही सुरू झाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात वाढली मतदानाची टक्केवारी
४नंदुरबार वगळता सर्वच मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. नंदुरबार मतदारसंघात गेल्या पंचवार्षीकला ६१.६७ टक्के मतदान झाले होते. यावेळी केवळ ५५.२८ टक्के मतदान झाले. नवापूर मतदारसंघात सर्वात जास्त ७५.३७ टक्के मतदान झाले येथे देखील वाढ झाली आहे. अक्कलकुवा मतदारसंघात एक टक्का मतदान वाढले आहे. तर शहादा मतदारसंघात अवघे ०.१५ टक्के मतदान वाढले आहे. जिल्ह्यात एकुण ६६.३७ टक्के मतदान झाले.
४जळगाव जिल्ह्यात चोपडा, अमळनेर, जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर येथे गत विधानसभेपेक्षा कमी मतदान झाले असले तरी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या तुलनेत अधिक मतदान झाले आहे.

धुळ्यात सर्वात कमी मतदान
नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार मतदार संघात सर्वात कमी ५५.२८ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वाधिक ७५.३७ टक्के मतदान नवापूर मतदार संघात झाले आहे. तर धुळे जिल्ह्यात धुळे शहर मतदारसंघात सर्वात कमी ४९.८३ टक्के तर शिरपूर मतदार संघात ६५.७९ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक १०.५५ टक्के घट साक्री तालुक्यात झाली आहे.

Web Title: Voting decreases in 4 out of 5 constituencies in Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.