122 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू, मतदानासाठी सकाळपासून मतदारांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2022 08:50 AM2022-12-18T08:50:54+5:302022-12-18T08:51:45+5:30
जळगाव जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यात 18 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
जळगाव - जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यात 18 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मतदान प्रक्रियेला सकाळपासून सुरुवात झाली आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्याचं दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यात 18 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 140 ग्रामपंचायतींच्या 899 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यात 784 जागा सदस्य पदासाठी तर 115 जागा सरपंच पदासाठी आहेत. मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात 421 मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी 14 तालुक्यातील 2 लाख 15 हजार 629 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडावी म्हणून जिल्हाभरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्या म्हणजे सोमवारी मतमोजणी होणार आहे.