जळगाव जिल्ह्यात १२ बाजार समित्यांसाठी संथगतीने मतदान
By चुडामण.बोरसे | Published: April 28, 2023 12:52 PM2023-04-28T12:52:16+5:302023-04-28T12:55:37+5:30
आज अनेक बाजार समित्यांमध्ये मतदान
चुडामण बोरसे, जळगाव: जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी संथगतीने मतदान सुरु आहे. २१३ जागांसाठी ५४६ उमेदवार रिंगणात आहेत. पारोळा बाजार समितीसाठी सकाळी १०:३० पर्यंत १७८८ मतदारांपैकी २२२ जणांनी मतदान केले. यात अवघे ८.२१ टक्के तर जामनेर बाजार समितीसाठी सकाळी १०:३० पर्यंत १५ टक्के मतदान झाले.
चोपडा येथे चार मतदान केंद्रांवर सकाळी सरासरी २३ टक्के मतदान झाले. त्यात चोपडा,धानोरा, वैजापूर आणि घोडगाव येथे मतदान केंद्रे आहेत. रावेर येथे १० वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात ८ टक्के तर पाचोरा येथे ११ वाजेपर्यंत १५४ जणांनी मतदान केले.
मंत्री गुलाबराव पाटील धरणगावात ठाण मांडून
धरणगाव बाजार समितीसाठी सकाळी दहा वाजेपर्यंत २३९ मतदारांनी आपला हक्क बजावला. पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह सर्वच प्रमुख नेते धरणगावात ठाण मांडून आहेत.