उमवि व्यवस्थापन परिषदेच्या दोन जागांसाठी उद्या मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 03:30 PM2018-02-19T15:30:57+5:302018-02-19T15:32:37+5:30
उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या अधिसभेच्या सदस्यांमधुन व्यवस्थापन परिषदेवर पाठविण्यात येणाºया दोन जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. ८ सदस्यांपैकी ५ सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून, एका एससी प्रवर्गाच्या जागेसाठी उमेदवार नसल्याने या जागेसाठी मतदान होणार नसून, उर्वरीत दोन जागांसाठी मंगळवारी दुपारी १ वाजता मतदान होणार आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१९-उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या अधिसभेच्या सदस्यांमधुन व्यवस्थापन परिषदेवर पाठविण्यात येणाºया दोन जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. ८ सदस्यांपैकी ५ सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून, एका एससी प्रवर्गाच्या जागेसाठी उमेदवार नसल्याने या जागेसाठी मतदान होणार नसून, उर्वरीत दोन जागांसाठी मंगळवारी दुपारी १ वाजता मतदान होणार आहे.
उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांची मंगळवारी पहिली बैठक होणार आहे. त्यानंतर प्राध्यापक व प्राचार्य गटातील प्रत्येकी एक अशा दोन जागांसाठी मतदान होणार आहे. मतदान झाल्यानंतर दुपारी ४ वाजता मतमोजणी होणार आहे. प्राचार्य गटासाठी दोन जागांपैकी एक जागा बिनविरोध झाली आहे.
यांच्यात होणार रंगणार लढत
प्राचार्य गटाच्या खुल्या जागेसाठी शहादा येथील डॉ.आर.एस.पाटील व नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांच्यात लढत होणार आहे. तरप्राध्यापक गटाच्या खुल्या प्रवर्गात एन.मुक्ताचे प्रा.नितीन बारी व एन.मुक्टोचे प्रा.संजय सोनवणे यांच्यात लढत होणार आहे.