वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:47+5:302021-06-06T04:12:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ५ जून, जागतिक पर्यावरण दिनी शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विविध संस्था, संघटना ...

Vyakshavalli we soyare, forest | वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे

वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ५ जून, जागतिक पर्यावरण दिनी शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनीही या प्रसंगी रोप वाटप करत हा दिन साजरा केला.

सामाजिक वनीकरण विभाग

सामाजिक वनीकरण विभागातर्फे डिकसाई येथे वृक्षारोपणा करण्यात आले. यावेळी विभागीय वनाधिकारी डॉ.एस.आय.शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एस. दसरे, सरपंच सुनंदा सुर्यवंशी, हरित सेना सल्लागार सदस्य सुनिल वाणी, संजय बडगुजर, हरितसेना प्रशिक्षक प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण चव्हाण, किशोर कोळी , वनपाल सपना सोनार , अनिल साळुंखे, वनरक्षक सुवर्णा कुंभारे हे उपस्थीत होते. यशस्वितेसाठी तुळशीराम सुर्यवंशी, दीपक पाटील, भुषण लाडवंजारी, अभिषेक वाणी, तेजस वाणी, दिलीप कोळी, प्रकाश कोळी यांनी परिश्रम घेतले.

शिवसेना

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गुलाबराव पाटील यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त ५५ वृक्षांचे रोपण शिवसेना जळगाव महानगरतर्फे करण्यात आले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया, सचिव अमित जगताप, उपाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, युवासंघर्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष अर्जुन भारुळे, प्रीतम शिंदे, तुषार दापोरेकर, गोकुळ बारी, अमोल गोपाळ, सुरेश पाटील, रवींद्र सपकाळे, उमाकांत जाधव, पियुष हसवाल, पियुष तिवारी , प्रशांत वाणी, प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी उपस्थित होते.

श्रीराम माध्यमिक विद्यालय

मेहरुण येथील श्रीराम माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, नगरसेवक प्रशांत नाईक, संस्था सचिव अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते २५ झाडे लावण्यात आली. यावेळी विलास भदाणे , सलीम इनामदार , अनिल सोनवणे , नगरसेविका शबाना बी सादिक खाटीक, मुख्याध्यापक दिवाकर जोशी , सलमान खाटीक , नईम खाटीक, दिनेश पाटील,अमित तडवी, संतोष चाटे, शिक्षिका संध्या कुलकर्णी, शननो पिंजारी, प्रतिभा पाटील, जयश्री तायडे, संजय बडगुजर उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आल. यावेळी कार्यालयीन सचिव वैभव शिरतुरे, जितेंद्र केदार, दादा राठोड, स्वप्नील पाटील, गिरीश बिराडे, डॉ. नारायण अटकोरे, प्रवीण इंगळे, किरण पाटील, संजय शिंदे, किरण चव्हाण,मोहसिन शेख , झुबेर खान उपस्थित होते

अपर पोलीस अधिक्षकांनी केले वृक्षारोपण

अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी ५० झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला, तसेच प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे असे आवाहन देखील गवळी यांनी केले आहे.

काँग्रेस

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि जागतिक पर्या‌वरण दिवसानिमित्त रोप वाटप करण्यात आले. काँग्रेस सेवादल आणि नाना पटोले विचारमंचच्या माध्यमातून हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी गोकुळ चव्हाण नीलेश भोसले, नितीन चंदनशिव, बापु गुजर, विलास निकम, राहुल वाघ, सुनिल एकशिंगे, सागर चव्हाण दिलीप सुरवाडे, शांताराम भारुडे, भुषण जाधव, नितीन सिसोदिया उपस्थित होते.

Web Title: Vyakshavalli we soyare, forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.