वडगाव कॅनॉलला पाण्याची आस

By admin | Published: January 17, 2017 11:39 PM2017-01-17T23:39:42+5:302017-01-17T23:39:42+5:30

बाळद ता.पाचोरा : वडगाव कॅनॉलमध्ये गिरणा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली

Wadagaon canal water | वडगाव कॅनॉलला पाण्याची आस

वडगाव कॅनॉलला पाण्याची आस

Next


बाळद ता.पाचोरा : वडगाव  कॅनॉलमध्ये  गिरणा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली असून लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. लवकर पुरेसे पाणी न मिळाल्यास केळीच्या पिकास काही प्रमाणात फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
हा परिसर बागायती म्हणून ओळखला जातो. परिसरातील मुख्य पीक म्हणजे केळी हे आहे. इतर पिकांपेक्षा या पिकाला जादा पाणी लागते. बाळद शिवारात  मोठे धरण व पाट नाही. यामुळे भविष्यात शेतीसाठीचे पाणी तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात उद्भवू शकतो. यंदा वरुणराजा चांगला बरसला. परंतु पावसाचे पाणी वाहून गेले. पाण्याअभावी अनेक शेतकºयांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. माजी आमदार आर.ओ.पाटील व जि.प. माजी उपाध्यक्ष प्रकाश सोमवंशी यांनी े वडगाव कॅनॉलची दुरुस्ती करुन दोन-तीन वर्षे गिरणा धरणाचे पाणी या कॅनॉलला सोडून  १५ गावांना या पाण्याचा पाटचाºयांद्वारे लाभ झाला होता. गिरणा धरणातील पाणी साठ्यापैकी ८ टक्के पाणी हे वडगाव कॅनॉलसाठी राखीव असल्याने हे पाणी या कॅनॉलमध्ये सोडल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटेल आणि परिसरातील विहिरींच्या जलपातळीतही वाढ होईल.
परिसरात केळी, मका, ज्वारी, बाजरी या रब्बी पिकाचा पेरा सर्वाधिक आहे. हे पीक पाण्याशिवाय हिरावले जावू नये यासाठी गिरणा धरणाचे पाणी वडगाव कॅनॉलमध्ये सोडावे अशी मागणी  शेतकºयांनी केली आहे. (वार्ताहर)
वडगाव कॅनॉल हा ब्रिटीशकालीन  आहे.  या कॅनॉसाठी गिरणा धरणातील साठ्यापैकी ८ टक्के जलसाठा राखीव आहे. हे पाणी या कॅनालमध्ये सोडल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटू शकतो पण यासाठी गरज आहे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची.

Web Title: Wadagaon canal water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.