ग्रामस्वराज्य अभियानात वडगावची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 07:02 PM2018-04-13T19:02:00+5:302018-04-13T19:02:00+5:30
स्वच्छतेसह ग्राम विकासाच्या योजना राबविल्या जाणार
आॅनलाईन लोकमत
विवरे, ता.रावेर,दि.१३ : शासनाच्या ग्राम स्वराज अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वडगाव या गावाची ‘ग्राम स्वराज अभियाना’ साठी निवड करणयात आली आहे.
ग्राम स्वराज अभियान अंतर्गत गावात स्वछता राखणे, कौशल्य विकास, उज्वला पंचायती, किसान कल्याण कार्यशाळ, ग्रामशक्ती अभियान, समाजिक सलोखा साधने, पारदर्शता निर्माण करणे असे आठ उपक्रम वडगावात १४ एप्रिल ते ५ मे या २१ दिवसात राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि आमदार हरीभाऊ जावळे यांनी वडगाव ता.रावेर येथे ग्रामस्थांना एक छोेटेखानी कार्यक्रमात दिली.
प्रसंगी जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी जि.प.सभापती सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, डॉ. मिलिंद वायकोळे, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, पं. स. सभापती माधुरी नेमाडे, हिराभाऊ चौधरी, पं. स. सदस्य पी. के. महाजन, योगिता वानखेडे, शिवाजी पाटील, वडगावच्या सरपंच प्रतिभा वाघोदे, चिनावलच्या सरपंच भावना बोरोले, दुगार्दास पाटील, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचलन तालुका सरचिटणीस वासुदेव नरवाडे यांनी केले. आभार ग्रामसेवक महेंद्र दुटे यांनी मानले.