एमआयडीसीला ‘वाघूर’चे पाणी

By admin | Published: March 30, 2017 12:02 AM2017-03-30T00:02:56+5:302017-03-30T00:02:56+5:30

१ पासून प्रारंभ : प्रादेशिक कार्यालयाचा ठराव

Wadhoor's water to MIDC | एमआयडीसीला ‘वाघूर’चे पाणी

एमआयडीसीला ‘वाघूर’चे पाणी

Next

जळगाव : औद्योगिक वसाहत परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी स्थलांतरीत करण्यात येणार असल्याने हे काम होईपर्यंत एमआयडीसीला १ एप्रिलपासून मनपाकडून वाघूर धरणातून पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा निर्णय बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान,  एमआयडीसीला दुषीत पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीनंतर भुसावळ न.प. व रेल्वे विभागाला उपाय योजनाबाबत सूचना देण्यात आल्या.
बुधवारी  जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक झाली. एमआयडीसीला तापी नदीतून पाणीपुरवठा होत असल्याने तो दुषीत असल्याची तक्रार गेल्या वेळच्या बैठकीत उद्योजकांनी केली होती. भुसावळ न.प. व रेल्वे विभागाकडून सांडपाणी तापी नदीपात्रात  सोडले जाते. त्यासंदर्भात आज बैठकीत चर्चा होऊन भुसावळ न.प. व रेल्वे विभागाच्या अधिकाºयांना उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या.
मनपाकडून दररोज ६ एमएलडी पाणी
भुसावळ येथून महामार्गाच्या बाजूने जलवाहिनीद्वारे जळगाव एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. महामार्गाच्या कामामुळे ही जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे एमआयडीसीला पाणी पुरवठ्याची अडचण येऊ नये म्हणून जळगाव महापालिकेकडून वाघूर धरणातून दररोज सहा  एमएलडी पाणी पुरविले जाणार आहे. याची १ एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. तीन महिन्यापर्यंत पाणी दिले जाईल. प्रादेशिक कार्यालय जळगावात
एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयाला ८५ टक्के महसूल जळगावातील उद्योगांकडून मिळतो. असे असले तरी हे कार्यालय धुळे येथे आहे.  जळगावातील  उद्योजकांना धुळे येथे जावे लागते. त्यामुळे जास्त महसूल देणाºया उद्योजकांची संख्या जळगावात असल्याने   जळगावात प्रादेशिक कार्यालय असावे असा या बैठकीत ठराव करण्यात आला.  घातले आहेत.  मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांच्यासह महसूल, महावितरण, रेल्वे, भुसावळ न.प., एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 

Web Title: Wadhoor's water to MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.