‘वाघूर’चे पाणी मिळणार पाईप लाईनद्वारे

By Admin | Published: July 5, 2016 06:39 PM2016-07-05T18:39:28+5:302016-07-05T18:39:28+5:30

वाघूर धरणाच्या डाव्या कालव्यावरून बंदीस्त पाईप लाईनने सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्राच्या कृषि सिंचन योजनेतून निधी प्राप्त झाला असून मार्च २०१७ पर्यंत हे काम पूर्ण करणे

'Waghoor' will get water by pipeline | ‘वाघूर’चे पाणी मिळणार पाईप लाईनद्वारे

‘वाघूर’चे पाणी मिळणार पाईप लाईनद्वारे

googlenewsNext

निधी प्राप्त : मार्च २०१७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे बंधन
जळगाव : वाघूर धरणाच्या डाव्या कालव्यावरून बंदीस्त पाईप लाईनने सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्राच्या कृषि सिंचन योजनेतून निधी प्राप्त झाला असून मार्च २०१७ पर्यंत हे काम पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या माध्यमातून जळगाव तालुक्यातील ६ हजार ६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
भादली शाखा कालवा व वितरिकेव्दारे ८११५ हेक्टर सिंचनक्षेत्र प्रस्तावित आहे. मात्र या क्षेत्रात भूसंपादन प्रक्रियेस झालेल्या विरोधामुळे वितरण प्रणालीचे काम २०१० पासून अपूर्णावस्थेत आहे. परिणामी जवळपास ६६३२ हेक्टर सिंचन क्षमतेपासून जळगाव तालुक्यातील डाव्या कालव्यावरील परिसर वंचित आहे.
वाघूर प्रकल्प हा केंद्र शासनाच्या वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आला आला आहे. त्यामुळे कालमर्यादा निश्चित करून प्रकल्पाच्या कालव्यांचे काम पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार मार्च २०१७ पर्यंतची डेड लाईन ठरवून देण्यात आली आहे.
३५ ते ४० किलो मीटर पाईपलाईन
या क्षेत्रासाठी ३५ ते ४० किलो मीटर लहान व मोठी पाईप लाईन टाकली जाणार आहे. कामाच्या नियोजनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात असून नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे प्रस्तावित आहे.

Web Title: 'Waghoor' will get water by pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.