वाघूर धरण साठ्यात १० दिवसात ६ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:04 AM2020-07-17T00:04:39+5:302020-07-17T00:05:12+5:30

तीन मोठ्या प्रकल्पात १५.१४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा

Waghur Dam stocks increase by 6% in 10 days | वाघूर धरण साठ्यात १० दिवसात ६ टक्क्यांनी वाढ

वाघूर धरण साठ्यात १० दिवसात ६ टक्क्यांनी वाढ

Next

जळगाव : जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये १५.१४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. वाघूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या १० दिवसात वाघूर धरणाच्या साठ्यात ५.८५ टक्कांनी वाढ झाली आहे. तर मंगरुळ व हिवरा हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.
जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गूळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे १३ मध्यम प्रकल्प आहे. तर ९६ लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा १४२७.५१ दलघमी म्हणजेच ५०.४० टीएमसी आहे.
तीनही धरणांच्या साठ्यात वाढ
सलग पाऊस सुरू असल्याने वाघूर, गिरणा, हतनूर धरणाच्या साठ्यात वाढ होत आहे. १० दिवसांपूर्वी ६ जुलै वाघूर धरणात ७२.३४ टक्के साठा होता. तो १६ जुलै रोजी ७८.१८ टक्क्यांवर पोहचला आहे. अशाच प्रकारे गिरणा धरणात ६ जुलै रोजी ३७.८३ टक्के असलेला साठा १६ जुलैपर्यंत ३८.२६ टक्क्यांवर पोहचल आहे. हतनूर धरणाचीही पाणी पातळी वाढत असल्याने धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरणात सध्या १३.३३ टक्के साठा आहे. ६ जुलै रोजी हा साठा १८.४३ टक्के होता.
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा १०२७.१० दलघमी म्हणजेच ३६.२६ टीएमसी इतका असून १६ जुलैअखेर या प्रकल्पांमध्ये ४२८.६३ दलघमी म्हणजेच १५.१४ टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात १.२० टीएमसी, गिरणा ७.०७ टीएमसी तर वाघूर धरणात ६.८६ टीएमसी उपयुक्त साठा आहे. वाघूर धरणाच्या क्षेत्रात गेल्यावर्षी १६ जुलैपर्यंत २२७ मिमी पाऊस पडला होता. तर यावर्षी १६ जुलैपर्यंत ३२१ मिमी पाऊस पडल्याने जळगाव शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे.
तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा २०३.९१ दलघमी म्हणजेच ७.२० टीएमसी आहे. तर जिल्ह्यातील ९६ लघु प्रकल्पात ४५.३७ दलघमी म्हणजेच ६.९३ टीएमसी उपयुक्तसाठा आहे.
जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा ७६.७३ टक्के, मंगरुळ १०० टक्के, सुकी ८६.०३ टक्के, मोर ६५.२१ टक्के, अग्नावती ५५.०५, हिवरा १०० टक्के, बहुळा - ३८.४९, तोंडापूर ६५.४९ टक्के, गूळ ६९.५२ टक्के जलसाठा आहे.

Web Title: Waghur Dam stocks increase by 6% in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव