वाघूर, हतनूरचा जलसाठा ८० टक्क्यांवर; अग्नावती, हिवरा व मन्याड मात्र शून्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2023 04:15 PM2023-09-15T16:15:33+5:302023-09-15T16:16:08+5:30

वाघूर, हतनूर आणि गिरणा या तीन मोठ्या प्रकल्पातील जलसाठा ८७ टक्क्यांवर होती

Waghur, Hatnoor water storage at 80 percent; Agnavati, Hivara and Manyad are at zero | वाघूर, हतनूरचा जलसाठा ८० टक्क्यांवर; अग्नावती, हिवरा व मन्याड मात्र शून्यावरच

वाघूर, हतनूरचा जलसाठा ८० टक्क्यांवर; अग्नावती, हिवरा व मन्याड मात्र शून्यावरच

googlenewsNext

कुंदन पाटील

जळगाव : हतनूरपाठोपाठ वाघूरमधील जलसाठाही समाधानकारक झाला आहे. दोन्ही धरणांमधील साठा ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गिरणा धरणातील जलसाठा ५४.०६ टक्के झाला असताना जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पातील जलसाठा मात्र शून्यावरच आहे.

अग्नावती, हिवरा आणि मन्याड धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. गेल्यावर्षी १५ सप्टेंबरपर्यंत या तीनही धरणातील जलसाठाअनुक्रमी ३१, २८ व ९९ टक्के इतका होता. वाघूर, हतनूर आणि गिरणा या तीन मोठ्या प्रकल्पातील जलसाठा ८७ टक्क्यांवर होती. यंदा मात्र ही ६७ टक्क्यांवर आहे. तर गेल्यावर्षी जिल्ह्यातील जलसाठा ८७.८२ टक्के इतका होता. यंदा ४८.३४ टक्के इतका आहे.

प्रकल्पनिहाय जलसाठ्याची टक्केवारी
प्रकल्प-टक्केवारी
हतनूर-८०.७८
गिरणा-५४.०६
वाघूर-८०.१४
सुकी-१००
अभोरा-१००
मंगरूळ-१००
मोर-८४.८५
अग्नावती-००
हिवरा-००
बहुळा-७.५६
तोंडापूर-१००
अंजनी-६४.६२
गूळ-८६.१२
भोकरबारी-३.२९
बोरी-१४.९३
मन्याड-००

Web Title: Waghur, Hatnoor water storage at 80 percent; Agnavati, Hivara and Manyad are at zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी