बोदवड येथील रस्त्याची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 06:32 PM2020-07-27T18:32:05+5:302020-07-27T18:32:13+5:30

नागरिकांचे हाल : मोठ मोठे खड्डे आणि गटारीच्या घाण पाण्यांचे साचले डबके

Wait for the road at Bodwad | बोदवड येथील रस्त्याची लागली वाट

बोदवड येथील रस्त्याची लागली वाट

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बोदवड : शहरातील मुक्ताईनगर कडे जाणारा रस्ता बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट जवळ अत्यंत विदारक झाला असून आजूबाजूच्या गटारींचे घाण पाणी या रस्त्यावर येत आहे. यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून, या रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दररोज दुचाकीस्वार व नागरिक या गटारीच्या घाण पाण्यात पडून अपघातग्रस्त होत आहेत.
या रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्यासही अपायकारक परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी संबंधितांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सदर गटार ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगून नगरपंचायत कडून चालक ढकल होत आहे, तर ही स्वचतेची जबाबदारी नगरपंचायतची असल्याचे कारण सांगून बांधकाम विभाग मोकळा होत आहे.
सदर रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद- इंदोर असा एकूण तिन्ही विभागची जबाबदारी असताना कोणीच जबाबदारी स्वीकारायला तयार नाही.याबाबत शहरातील अशोक तायडे, नरेंद्र कदम, निलेश माळी, मनोज तेलीआदींनी नगरपंचायतला निवेदन ही दिले असून सदर गटारीच्या घाण पाण्यामुळे आरोग्य समस्या उद्भवल्यास नगरपंचायतच्या संबंधित अधिकाऱ्यांवर फिर्याद दिली जाईल, असे निवेदन देण्यात आले आहे.

Web Title: Wait for the road at Bodwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.