प्राचीन मंदिराची वाट ‘बिकटच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:50+5:302021-06-28T04:12:50+5:30
धरणगाव : येथील ऐतिहासिक शिवमंदिर हे सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचे आहे. मात्र या मंदिरास अद्यापही चांगला रस्ता नसल्याने ...
धरणगाव : येथील ऐतिहासिक शिवमंदिर हे सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचे आहे. मात्र या मंदिरास अद्यापही चांगला रस्ता नसल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
हे शिवमंदिर म्हणून धरणगाव तालुक्यात प्रसिद्ध आहे. अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. मात्र येथे चांगला रस्ता नसल्याने मंदिरात पावसाळ्यात जाणे कठीण होऊन बसते.
हा रस्ता दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी भक्तांकडून होत आहे. धरणगाव शहरात रस्त्यांची कामे जोरात सुरू असून, मंदिरात जाण्यासाठी मात्र रस्ता तयार होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत भाविकांनी तहसीलदार, प्रांत तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा रस्ता तयार करून द्यावा, असे निवेदन दिले होते. या ठिकाणी काही वर्षांपूर्वी रस्त्याचे मोजमाप झाले मात्र काम झालेच नाही. सध्याची परिस्थिती पाहता मंदिराच्या रस्त्याच्या आजूबाजूला काही लोक शौचास बसत असल्याने एक प्रकारे विटंबनाच होत आहे.
या रस्त्याच्या कामाबाबत पूर्णपणे माहिती घेऊन नगरपालिका हद्दीतील असल्यास पालिकेला रस्ता तयार करण्याचे आदेश देण्यात येतील.
- नितीनकुमार देवरे, तहसीलदार, धरणगाव
रस्त्याची दुरवस्था झाल्याने भक्तांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. या ऐतिहासिक मंदिरासाठी रस्ता तयार करण्यात यावा.
- कैलास माळी, गटनेते भाजप
फोटो २८ एचएसके ०२ आणि ०३
धरणगाव येथील प्राचीन मंदिर. या मंदिराकडे जाणारा कच्चा रस्ता. (कल्पेश महाजन)