कैरी बाजारालाही पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:32 PM2019-06-23T12:32:24+5:302019-06-23T12:32:55+5:30

तीन आठवडे उलटूनही हवी तशी मागणी नाही

Waiting for the Carrie Market too | कैरी बाजारालाही पावसाची प्रतीक्षा

कैरी बाजारालाही पावसाची प्रतीक्षा

googlenewsNext

जळगाव : पावसाने दडी मारल्याचे परिणाम सर्वच घटकांवर जाणवताना दिसत आहे़ लोणच्याच्या कैऱ्या बाजारात दाखल झाल्या आहेत मात्र, पाऊस नसल्याने या कैऱ्यांना हवी तशी मागणीच नसल्याचे कैरी विक्रेत्यांनी सांगितले़ शनिवारी जळगावात आठवडे बाजारात छोट्या मोठ्या अशा सुमारे दोनशे कैरी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती, मात्र फारसी ग्राहकीच नसल्याचे चित्र होते.
जून महिन्याचा शेवटचा आठवड उजाडत असला तरी पावसाने हजेरी लावलेली नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे़ गेल्या वर्षीच्या कमी पर्जन्यामुळे आधीच पाणी संकट बिकट झाले असून पावसाला होणारा विलंब अनेक समस्यांना आमंत्रण देत असल्याचे चित्र आहे़ दरवर्षी साधारण पहिला पाऊस पडल्यानंतर गृहीणींचा ओढा लोणचे टाकण्याकडे असतो़ मात्र यंदा पाऊस लांबल्यामुळे हे नियोजनही कोलमडल्याचे चित्र आहे़ शनिवारच्या बाजारात सकाळी साडे अकराच्या सुमारास काही प्रमाणात गर्दी पाहायवयास मिळाली़ सकाळपासूनच सात ते आठ टेप्मो व अन्य छोटे छोटे विक्रेते कैºया विक्री करीत होते़ एका वाहनात साधारण तीन ते चार टन कैºया असतात,अशा किमान सहा ते सात वाहने कैºयांची विक्री म्हणजेच वीस ते तीस टन कैºयांची शनिवारच्या बाजारात विक्री होईल, असा अंदाज काही विक्रेत्यांनी वर्तविला़ यापेक्षा पुढील शनिवारी अधिक उलाढाल होण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे़ २५ ते ४० रूपये किलोपर्यंत कैºयांची विक्री होत आहे़ यासह लोणच्यासाठी लागणारे अन्य साहित्य विक्रीची लगबग वाढली आहे़
कैºयांचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध
राजापुरी, सरदार, वनराज असे विविध कैºयांचे प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत़ यात सरदार व राजापुरीला सर्वाधिक मागणी असल्याचे धरणगाव येथून आलेले कैरी विक्रेते लक्ष्मण भोई यांनी सांगितले़ राजापूरी २५ रूपये किलो तर सरदार कैरी ३० रूपये किलोप्रमाणे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले़ कैºयांची आवक ही गुजरात राज्यातून होत असते़ तर आपण गेल्या तीन आठवड्यांपासून दुकान थाटत आहोत मात्र, यंदा पाऊस नसल्याने हवी तशी मागणी नसल्याचे विक्रेते भीवा भोई यांनी सांगितले़

Web Title: Waiting for the Carrie Market too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव