सात वर्षांपासून अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:14 AM2020-12-29T04:14:24+5:302020-12-29T04:14:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - मनपातील १०९ अनुकंपाधारकांच्या जागेपैकी ७० अनुकंपाधारकांची भरती करण्यात आलेली नाही. गेल्या तीन वर्षांपासून अनुकंपाधारक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपातील १०९ अनुकंपाधारकांच्या जागेपैकी ७० अनुकंपाधारकांची भरती करण्यात आलेली नाही. गेल्या तीन वर्षांपासून अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत मनपाच्या फेऱ्या मारत असून, सोमवारी अनुकंपाधारकांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली. तसेच लवकरात लवकर अनुकंपाधारकांची भरती करण्यात यावी या मागणीचे निवेदन देखील मनपा आयुक्तांना देण्यात आले. तसेच त्वरित भरती न केल्यास कुंटूंबियांसह आंदोलनाचा इशारा देखील आता अनुकंपाधारकांनी दिला आहे.
दरम्यान, अनुकंपाधारकांनी उपमहापौर सुनील खडके यांच्याकडे देखील आपल्या व्यथा मांडल्या.
कोट..
अन्यथा आम्हालाही आंदोलन करावे लागेल
अनुकंपाधारकांसाठी मनपा प्रशासनाकडे अनेकवेळा प्रस्ताव सादर केले आहेत. महासभेत देखील याबाबत अनेकदा प्रस्ताव मांडून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांकडे देखील अनुकंपाधारकांच्या व्यथा अनेकवेळा मांडल्या. मात्र, ढीम्म प्रशासन जर ऐकत नसेल तर प्रशासनाविरोधात नाईलाजास्तव कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. प्रशासनाने अनुकंपाधारकांबाबत गांभिर्याने विचार करावा.
-कैलास सोनवणे, नगरसेवक,