कोरोनामुळे नगरसेवक अपात्रतेच्या याचिकेवरील कामकाजाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:15 AM2021-05-10T04:15:11+5:302021-05-10T04:15:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेत अडीच वर्षांतच सत्ता गमावण्याची वेळ भाजपवर आल्यानंतर भाजपने २७ बंडखोर नगरसेवकांना अपात्र करण्याबाबत ...

Waiting for the coroner to act on the corporator's disqualification petition | कोरोनामुळे नगरसेवक अपात्रतेच्या याचिकेवरील कामकाजाची प्रतीक्षाच

कोरोनामुळे नगरसेवक अपात्रतेच्या याचिकेवरील कामकाजाची प्रतीक्षाच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेत अडीच वर्षांतच सत्ता गमावण्याची वेळ भाजपवर आल्यानंतर भाजपने २७ बंडखोर नगरसेवकांना अपात्र करण्याबाबत नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव सादर करून आता महिना उलटला असून देखील नगरसेवकांना आतापर्यंत कोणतीही नोटीसदेखील बजावण्यात आलेली नाही. कोरोनामुळे भाजपच्या याचिकेवरील कामकाज ही अद्यापपर्यंत होऊ शकलेले नसून आता पुढील महिन्यातच याबाबत कामकाज होणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.

मनपाच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या आधी भाजपच्या, २७ नगरसेवकांनी शिवसेनेचा महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देत महापालिकेत मोठे सत्तांतर घडवून आणले. याविरोधात भाजपने बंडखोर नगरसेवकांविरोधात नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे संबंधित नगरसेवक अपात्र करण्यात यावे यासाठी याचिका दाखल केली आहे. याबाबत भाजपकडून ॲड. सतीश भगत हे काम पाहत आहेत. मात्र, कोरोनामुळे या याचिकेवर अद्यापपर्यंत कोणतेही कामकाज झालेले नाही. तसेच ॲड. सतीश भगत यांनादेखील कोरोनाची लागण झाल्यामुळे कोणत्याही बंडखोर नगरसेवकाला अद्यापपर्यंत नोटीसदेखील बजावण्यात आलेली नाही. दरम्यान येत्या आठ दिवसांत संबंधित नगरसेवकांना नोटीसदेखील बजावण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. २७ बंडखोर नगरसेवकांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात यावी म्हणून भाजप गटनेते भगत बालानी यांनी तब्बल तीस हजार पानांची कागदपत्रे विभागीय आयुक्तांकडे सादर केली आहेत.

बंडखोर नगरसेवकांकडून ही भाजपचे नगरसेवक अपात्र ते बाबत प्रस्ताव सादर

भाजपच्या गटनेत्यांनी बंडखोर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत प्रस्ताव सादर केल्यानंतर बंडखोर नगरसेवकांनी देखील भाजपच्या काही नगरसेवकांवर कारवाई करण्याबाबत १२ मे रोजी होणाऱ्या महासभेत घरकूल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे याबाबतचा प्रस्ताव नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी सादर केला आहे. येत्या महासभेत या प्रस्तावावर देखील चर्चा होणार आहे. यामध्ये भाजपचे गटनेते भगत बालानी, लता भोईटे, सदाशिवराव ढेकळे व स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांचा समावेश असून, बंडखोर नगरसेवकांपैकी दत्तात्रय कोळी यांचा देखील समावेश आहे. येत्या महासभेत या प्रस्तावावरून देखील वाद विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Waiting for the coroner to act on the corporator's disqualification petition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.