मान्सूनपूर्व कपाशी लागवडीसाठी गिरणेच्या पाण्याच्या आवर्तनाची प्रतीक्षा
By admin | Published: May 23, 2017 04:00 PM2017-05-23T16:00:34+5:302017-05-23T16:00:34+5:30
चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, जळगाव, एरंडोल तालुक्यातील शेतक:यांची मागणी
Next
>ऑनलाईन लोकमत
खेडगाव ता.भडगाव,दि.23- यंदा गिरणा धरणात ब:यापैकी जलसाठा असून मान्सूनपूर्व कपाशी लागवडीसाठी एक आवर्तन मिळण्याची अपेक्षा शेतक:यांना आहे. मात्र पाटबंधारे विभागाकडून कोणतीही हालचाल दिसत नसल्याने शेतकरी आवर्तन मिळणार की नाही या चिंतेत शेतकरी आहेत.
मान्सूनपूर्व लागवडीचा लाभ
मे चा शेवटचा किंवा जूनचा पहिला आठवडा मान्सूनपूर्व कापूस लागवडीसाठी व उत्पादनवाढीसाठी महत्वाचा समजला जातो. त्यामुहे उत्पन्नात दुपटीचा फरक पडतो. उशीराने किंवा पावसाच्या आगमनानंतर केलेल्या कापूस लागवडीपेक्षा मान्सूनपूर्व लागवड अधिक उत्पन्न व कमी रोगराई या दृष्टीने शेतक:यांसाठी फायद्याची ठरते. सध्या ज्या शेतक:यांकडे विहिरींना थोडेफार पाणी आहे, असे शेतकरी ठिबक संचावर कापूस लागवड करीत आहेत. मात्र पाटाच्या पाण्यावर अवलंबून असलेला शेतकरी स:या पाडून आवर्तनाची तारीख केव्हा जाहीर होते याकडे नजर ठेवून आहे.
तेव्हा आवर्तन दिले आता का नाही?
याआधीचा विचार करता 2010-2011 या दोन वर्षी लागोपाठ मे महिन्यात धरणात अल्प जलसाठा असतानाही तत्कालिन जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग यांनी मे महिन्यात कापूस लागवडीसाठी शेतक:यांना एक आवर्तन दिले. यावेळेस तर धरणातील जलसाठा ब:यापैकी असताना आवर्तन का नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे.